एक्स्प्लोर

हंडाभर पाण्यासाठी रेल्वेने 14 किमी प्रवास, औरंगाबादेतील भीषण प्रकार

हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरची वेळ झाली, की हातात हंडा घेऊन ट्रेनची वाट पाहणारी माणसं 'रेल्वे आली, पाणी भरायला चला...' अशा हाका-आरोळ्या देतात आणि सुरु होतो हंडाभर पाण्यासाठी 14 किलोमीटरचा प्रवास

औरंगाबाद : हंडाभर पाण्यासाठी नाशिकमध्ये महिलांना कसरत करुन विहिरीत उतरावं लागत असल्याचं आपण पाहिलं. एक हंडा पाण्यासाठी औरंगाबादमध्ये रस्त्यावर टाकलं जाणारं पाणी हंड्यात भरताना पाहिलं. दुष्काळाचं भयाण चित्र दाखवणारी आणखी एक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. एक कळशी पाण्यासाठी जीव धोक्यात घालून नागरिकांना रेल्वेने 14 किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी स्टेशनवर हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरची वेळ झाली, की हातात हंडा घेऊन ट्रेनची वाट पाहणारी माणसं 'रेल्वे आली, पाणी भरायला चला...' अशा हाका-आरोळ्या देताना ऐकू येतात. त्यानंतर ट्रॅकशेजारी असलेले अनेक जण हंडा-कळशा घेऊन रेल्वेच्या दिशेने धाव घेतात. एका बाजूने प्रवासी रेल्वेमध्ये चढतात, तर दुसऱ्या बाजूने जास्तीत जास्त हंडे रेल्वेत चढवण्यासाठी चिमुकले, बायाबापड्या आणि वयोवृद्धांचीही कसरत सुरु होते. दहा वर्षांच्या सिद्धार्थ ढगे आणि साठीपार केलेल्या सीताबाई कांबळे यांच्यासारख्या अनेकांचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा हा दिनक्रम आहे. औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर गाडीचं औरंगाबाद हे शेवटचं रेल्वे स्टेशन. एकीकडे उतरणाऱ्यांना जायची घाई असते, तर चढणाऱ्यांना जागा पकडण्याची. तेव्हा, दुसरीकडे रेल्वे धुण्यासाठी आणि रेल्वेत पाणी भरण्यासाठी रेल्वे स्टेशनवर असलेल्या पाईपमधून पाणी भरण्यासाठी सिद्धार्थ-सीताबाईंसारख्या गावकऱ्यांची कसरत सुरु होते. गर्दी नसेल तर नशीब, मात्र औरंगाबाद स्टेशनवर केवळ पाच मिनिटासाठी ट्रेन थांबली असताना हंडे भरणं म्हणजे दिव्यच. गर्दी असेल तर इतर प्रवासीही हंडे भरु देत नाहीत आणि पोलिसही हंडे फेकून देतात. या भागातील काही नागरिकांनी आता रेल्वेतून पाणी आणणं बंद केलं आहे. रेल्वे रुळांशेजारी राहणाऱ्या ज्ञानोबा लोखंडे यांना असंच पोलिसांनी पाणी भरताना हटकलं. त्यांचा हंडा फेकून दिला. तेव्हापासून ते स्टेशनला पाण्यासाठी गेले नाहीत. दुसरीकडे, मुलं-बाळं रेल्वेने पाणी आणण्यासाठी गेली आहेत, त्यामुळे कामावर गेलेल्या आई-बापांचा जीव टांगणीला असतो. गाडी परत येते तेव्हा आई-बाप डोळ्यात प्राण आणून मुलांची स्टेशनवर वाट पाहत असतात. जेव्हा लेकरु आणि हंडाभर पाणी नजरेस पडतं, तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडतो. महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक दुष्काळ पाहिले, पण अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. दोन वर्षांपूर्वी याच दुष्काळामुळे लातूरकरांना रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं आणि आता औरंगाबादेत रेल्वेने पाण्यासाठी 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. आजही हे वास्तव आहे मराठवाड्याच्या भयाण दुष्काळाचं. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैशाने पाणी विकत घेतात. मात्र ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांना पाण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करावा लागतो, हे सत्य आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget