एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aurangabad: सिटी बस अडवणाऱ्या 'फायनान्स' कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

थेट महानगरपालिकेची गाडी आडवल्याने सर्वत्र या घटनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती. त्यामुळे अखेर प्रशासनाकडून या प्रकरणी चार लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad Latest Crime News Update : कर्जवसुलीसाठी बँकांनी नियुक्त केलेल्या एजन्सींचे लोक गुंडगिरी करत असल्याच्या तक्रारी वारंवार येतात. त्याचाच प्रत्यय औरंगाबादच्या स्मार्ट सिटी प्रशासनाला आला. कारण वसुली एजन्सीच्या चार गुंडांनी सोमवारी एक सिटी बस अडवून, त्यांतील प्रवाशांना चक्क खाली उतरविले. बसच्या कर्जाचे हप्ते थकल्याने आम्ही बस उचलण्यासाठी आलो आहोत, असे सांगत या गुंडांनी हा प्रकार केला. मात्र त्या बसवर कर्जचं नसल्याचे समोर आल्यावर वसुलीसाठी आलेल्या नागरिकांनी चूक झाली असे म्हणत त्यांनी माफी मागितली. मात्र याप्रकरणी आता चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्मार्ट सिटीची फुलंब्री-बिडकीन बस (एमएच 20 इजी 9556) सोमवारी दुपारी हर्सल टी पॉइंट येथून जात होती. त्याचवेळी चार-पाच जणांनी गाडी अडवली. तर बसमध्ये चढून त्यांनी प्रवाशांशी अरेरावी केली. तसेच त्यांना खाली उतरविले. काय घडतेय हे कुणालाच कळत नव्हते. वाहक आणि चालकाने 'तुम्ही कोण आहात आणि हे कशामुळे करताय?' अशी विचारणा केली. त्याच्या उत्तरात त्यांनी 'या गाडीवर कर्ज आहे. तिचे हप्ते थकले आहेत, त्यामुळे गाडी ताब्यात घेण्यासाठी आलो असल्याचं म्हणाले. त्यामुळे शेवटी प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बसवर कोणतेही कर्ज नव्हते. त्यामुळे वसुलीसाठी आलेल्या लोकांनी माफी मागत, तसं लेखी लिहून दिल्याने प्रकरण मिटले.

दोन दिवसांनी गुन्हा दाखल...

थेट महानगरपालिकेची गाडी आडवल्याने सर्वत्र या घटनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती. त्यामुळे अखेर प्रशासनाकडून या प्रकरणी चार लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चरण नरसिंग जाधव, राहुल रतन हिवराळे, राहुल विलयन्स वडगाळे, विवेक अशोक चव्हाण यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस नगदी खरेदी...

विशेष म्हणजे फायनान्स एजंट असल्याचं सांगून ज्या लोकांनी सिटी बस अडवली होती, ती बस नगदीने खरेदी करण्यात आली होती. बसची नगदी खरेदी करण्यात आली होती. स्मार्ट सिटी प्रशासनाने 2018 मध्ये टाटा कंपनीकडून शंभर बसची खरेदी केली. ही खरेदी 36 कोटी रुपये देऊन रोखीने करण्यात आली होती. त्यामुळे या गाड्यांसाठी कोणतेही कर्ज घेण्यात आले नाही. परिणामी कर्जाचा हप्ता थकण्याचा विषयच नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaPriyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथPM Narendra Modi Threaten :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Embed widget