एक्स्प्लोर

औरंगाबाद महापालिकेत भाजप सत्तेतून बाहेर, उपमहापौरपदाचा राजीनामा

राज्यातील शिवसेना-भाजपची युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवत होते. मागील अनेक वर्षे सभागृहात एकत्र बसणारे युतीचे नगरसेवक सर्वसाधरण सभेतही वेगवेगळे बसल्याचं चित्र होतं.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजप युती तुटली. त्याचाच परिणाम आता औरंगाबाद महापालिकेतही पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिकेत गेली 27 वर्ष शिवसेना-भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. मात्र आज भाजपाने शिवसेनेसोबत काडीमोड घेतला. विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजपा सत्तेतून बाहेर पडली आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहरातील सोळाशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला शिवसेनेने स्थगिती दिली आहे. याशिवाय लोक आम्हाला विचारणा करत आहेत, राज्यात तुम्ही एकत्र नाहीतर औरंगाबाद महानगरपालिकेत कसे? यामुळे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक असताना भाजपने हा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, भाजपाने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला असला तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला पाहायला मिळणार हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. राज्यातील शिवसेना-भाजपची युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवत होते. मागील अनेक वर्षे सभागृहात एकत्र बसणारे युतीचे नगरसेवक सर्वसाधरण सभेतही वेगवेगळे बसल्याचं चित्र होतं. मात्र तूर्तास राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना - 29 एमआयएम - 25 भाजप - 22 काँग्रेस - 08 राष्ट्रवादी - 04 इतर - 24 एकूण -112 औरंगाबाद की संभाजीनगर शिवसेना-भाजपा आमनेसामने औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद की संभाजीनगर असा प्रश्न ज्या वेळेस उपस्थित व्हायचा त्यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक एकत्र येऊन एमआयएमविरुद्ध उभे ठाकायचे. मात्र आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद की संभाजीनगर या प्रश्नावरुन शिवसेना-भाजपाचे नगरसेवक एकमेकांविरोधात उभे राहिले. या वादाला निमित्त होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरें अभिनंदनाच्या प्रस्तावाचं. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमचे नगरसेवक सेना-भाजपचा हा राडा जागेवर बसून एन्जॉय करत होते.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget