एक्स्प्लोर

आकांक्षा देशमुख हत्येचा सात दिवसात छडा, चोराने खून केल्याचं उघड

औरंगाबादमध्ये 10 डिसेंबरला हॉस्टेलमध्ये आकांक्षाचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला आकांक्षा देशमुखने आत्महत्या केल्याचं वाटत असतानाच तिची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं.

औरंगाबाद : औरंगाबादमधील सिडको पोलिसांनी एमजीएम मेडिकल कॉलेजच्या आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा सात दिवसात छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या मजुराला अटक केली आहे. राहुल शर्मा असं आरोपीचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील दुद्धी सोनभद्रा इथला रहिवासी आहे. चोरीसाठी आलेल्या मजुराकडून आकांक्षाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. चोरी करण्यासाठी पत्रा तोडून हॉस्टेलमध्ये घुसलेल्या बांधकाम मजुरानेच आकांक्षाचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं आहे. आकांक्षाची हत्या झाल्याचं उलगडायला 24 तास का लागले? एमजीएम हॉस्टेलजवळच आणखी एका वसतिगृहाचं बांधकाम सुरु आहे. तिथेच आरोपी राहुल शर्मा बऱ्याच दिवसांपासून काम करत होता. पोलिसांनी सांगितलं की, 10 डिसेंबरला आकांक्षा रात्री साडेअकरा वाजता रुममध्ये आली. त्यानंतर एकच्या सुमारास शर्मा चोरीच्या उद्देशाने बाजूच्या बांधकामाचा पत्रा उचकटून हॉस्टेलमध्ये घुसला. त्याने चोरीचा प्रयत्न केल्यावर आकांक्षाने विरोध केला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, आकांक्षाचा विरोध वाढल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि गळ्यातील सोन्याची साखळी तोडून पळाला. औरंगाबादमध्ये मेडिकल विद्यार्थिनीची हत्या त्यानंतर तीन वाजता राहुल शर्मा एमजीएम परिसरातीलच त्याच्या घरी गेला. तिथून पाच वाजता रेल्वेने तो उत्तर प्रदेशात पसार झाला. पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास केला. सुरुवातीला तिथल्या मजुरांची यादी पोलिसांनी घेतली. त्यातले काही मजूर बेपत्ता आहेत का हे देखील तपासलं. त्यामुळे राहुल शर्मा बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करुन काल रात्री दोनच्या सुमारास वसतिगृहात आणलं. इथे त्याने आकांक्षाची हत्या कशाप्रकारे केली याची कबुली दिली. काय आहे प्रकरण? औरंगाबादमध्ये 10 डिसेंबरला हॉस्टेलमध्ये आकांक्षाचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला आकांक्षा देशमुखने आत्महत्या केल्याचं वाटत असतानाच तिची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं. बीडच्या माजलगावात राहणारी ही तरुणी फिजिओथेरपिस्ट होण्याचं स्वप्न घेऊन औरंगाबदच्या एमजीएम महाविद्यालयात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
Embed widget