एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amravati Blast : मोठी बातमी! अमरावतीच्या सेंट्रल जेलमध्ये स्फोट; रात्री अचनाक झालेल्या बॉम्ब सदृश्य स्फोटानं खळबळ

Blast Inside Amravati Central Jail : अमरावती मध्यवर्ती कारागृहात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून ही घटना कोणी घडवली याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

Amravati Blast : अमरावती : मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) रात्री अचनाक झालेल्या स्फोटानं अमरावती (Amravati News) पूर्णतः हादरुन गेलं आहे. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य स्फोट झाल्यानं मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुदैवाची बाब म्हणजे, या स्फोटात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. अमरावतीचे सीपी-डीसीपी आणि बॉम्ब निकामी पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अचनाक अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात मोठा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. 6 आणि 7 क्रमांकाच्या बॅरेकसमोर हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. रात्री 8.30 च्या सुमारास कारागृहात फटाक्यांची आतषबाजी किंवा बॉम्ब फुटल्याप्रमाणे मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपीसह बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. 

घटनेचा तपास करण्यासाठी तातडीनं फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं. मिडिया रिपोर्ट्सनुसार, शेजारच्या महामार्गाच्या कल्व्हर्टवरून फटाका किंवा बॉम्ब कारागृहात बॉलद्वारे फेकल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. कारागृहात बॉम्ब सदृश वस्तू फेकणारी व्यक्ती कोण? आणि असं करण्यामागे या व्यक्तीचा नेमका हेतू काय? याचा सध्या कारागृह प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणात सुदैवाची बाब म्हणजे, या प्रकरणात अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपीसह बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर 

अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्बसदृश वस्तू फेकण्यामागचं कारण तपासण्यात पोलीस सध्या व्यस्त आहेत. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनीही तपास सुरू केला आहे. फोरेन्सिक टीम स्फोटकांसाठी कशाचा वापर करण्यात आला याचाही तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बॉम्ब फेकणाऱ्या व्यक्तीचा नेमका हेतू काय? कशासाठी असं कृत्य केलं? याचा तपास सध्या फॉरेन्सिक टीम आणि कारागृह प्रशासनाकडून केला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : ..त्यांना भोगावेच लागणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलNana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
Embed widget