एक्स्प्लोर

गरजूंसाठी मोफत अभ्यासिकेचा स्तुत्य उपक्रम, ‘शहीद सुभेदार एन. के. खोब्रागडे वाचनालया’चा  4था वर्धापन दिन संपन्न!

शहीद सुभेदार एन. के. खोब्रागडे वाचनालय व अभ्यासिका केंद्रामार्फत अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर या गावामध्ये मोफत अभ्यासिका उपलब्ध करून दिली गेली आहे.

Amravati  : शहीद सुभेदार एन. के. खोब्रागडे वाचनालय, अभ्यासिकेचा 4था वर्धापनदिन रिद्धपुर येथे साजरा करण्यात आला होता. यानिमित्ताने पीएसआय रोशन ओकटे, नयना अमोल साखरकर आणि पोलीस शिपाई पदी नियुक्त मुजिब शेख व रिता गव्हांदे यांचा यावेळी सत्कार सोहळा यावेळी पार पडला. या सोहळ्याला करिअर व्हिजन अकादमीचे संचालक नितीन डेहा, धिरज थोरात, आकाश जावरकर व जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमणे देखील उपस्थित होते.

या खास प्रसंगी उपस्थित सर्व लोकांना या दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांनी मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्व, वाचनालयाची व अभ्यासिकेची गरज आणि आता युवकांसमोर असलेली आव्हाने, अभ्यासाची गरज या सर्वांचे महत्व यावेळी त्यांनी पटवून दिले. भाषेचा किंवा अपयशाचा न्यूनगंड त्यागून फक्त सकारात्मतेने अभ्यास करून निश्चितच यश प्राप्त होते हे विविधांगी उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले.

यावेळी त्यांनी खोब्रागडे वाचनालय व अभ्यासिका केंद्र हे सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल वाचनालय समितीचे अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त केली. पुढे दत्ताभाऊ ढोमणे यांनी वाचनालयास लागणाऱ्या कोणत्याही साहित्याची उपलब्धता त्यांच्यातर्फे करण्यात येईल, असे आश्वासन देऊन विद्यार्थाना कृतांत केले.

गरजूंसाठी मोफत अभ्यासिका

शहीद सुभेदार एन. के. खोब्रागडे वाचनालय व अभ्यासिका केंद्रामार्फत अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर या गावामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, गरीब-दुर्बल आणि वंचित ज्यांना खरोखर अभ्यासाची ओढ आहे, परंतु परिस्थितीमुळे व वातावरणामुळे ते करू शकत नाही, त्या सर्वांसाठी ही अभ्यासिका मोफत उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नाही तर, सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही याठिकाणी मोफतच घेतला जातो आणि पुस्तकेसुद्धा मोफत उपलब्ध करून दिली जातात.

भविष्यात आणखी पदे नक्की मिळवू!

या समारंभात पीएसआय रोशन ओकटे आणि पीएसआय नयना अमोल साखरकर यांनी विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करण्याचे आव्हान केले. यावेळी वाचनालयाने फक्त 2-3 पद पाहिलीत. परंतु, येत्या डिसेंबरपर्यंत या वाचनालयातून कमीत कमी 5 पदे येथील विद्यार्थी मिळवतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.74 टक्के मतदान; 12 पैकी 7 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.74 टक्के मतदान; 12 पैकी 7 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेत्यांच्या सगेसोयऱ्यांची फौज; कुणाची पत्नी, मुलगा तर कुणाचा जावई मैदानात, चर्चेला उधाण
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेत्यांच्या सगेसोयऱ्यांची फौज; कुणाची पत्नी, मुलगा तर कुणाचा जावई मैदानात, चर्चेला उधाण

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.74 टक्के मतदान; 12 पैकी 7 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.74 टक्के मतदान; 12 पैकी 7 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Embed widget