एक्स्प्लोर

Akola Elections : अकोला जिल्ह्यातील पाच पंचायत समितींवर महिला राज; पक्षांच्या प्रमुख नेत्यांची 'फिल्डिंग' सुरु

अकोला पंचायत समितीमध्ये भाजपकडून निवडून आलेल्या सुलभा सोळंके या एकमात्र अनुसूचित जमातीच्या महिला सदस्या आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षणामुळे सभापतीपदाची लॉटरी लागली.

Akola News : अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितींच्या सभापती पदाची आरक्षण सोडत निघाली आहे. यावेळी पाच पंचायत समितींच्या सभापती पदासाठी महिला आरक्षण निघाल्याने तेल्हारा, अकोला, पातूर, बार्शीटाकळी आणि अकोट पंचायत समितीवर महिलांचा राज राहणार आहे. तर दुसरीकडे पंचायत समितींमध्ये सत्ता स्थापनेसाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी 'फिल्डिंग' लावण्यास सुरूवात केली आहे. 

नवीन समीकरणाकडे लक्ष

या आरक्षण सोडतीमुळे काही नवीन राजकीय समीकरणे तयार होतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सभापदी आणि उपसभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सर्वात आधी पंचायत समिती सभापतीपदी ज्या प्रवर्गाचे आरक्षण होते ते वगळण्यात आले.

'या' दोन पंचायत समिती वगळता सर्वांचे आरक्षण निश्चित

अकोट व पातूर पंचायत समिती वगळता इतर पंचायत समितींचे आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर अकोट व पातूर तालुक्यात नामाप्र प्रवर्गाचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. सोडतीत पातूर पंचायत समितीचे सभापती पद नामाप्र महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले, तर अकोट पंचायत समितीमधील सभापतीचे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले.  

सभापतींचे आरक्षण खालील प्रमाणे

पंचायत समिती आरक्षण 

  • मूर्तिजापूर अनुसूचित जाती
  • तेल्हारा अनुसूचित जाती (महिला)
  • अकोला अनुसूचित जमाती (महिला)
  • पातूर नामाप्र (महिला)
  • बाळापूर सर्वसाधारण
  • बार्शीटाकळी सर्वसाधारण (महिला)
  • अकोट सर्वसाधारण (महिला) 

भाजपच्या सोळंकेंना लॉटरी

अकोला पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. पंचायत समितीमध्ये भाजपकडून निवडून आलेल्या सुलभा सोळंके या एकमात्र अनुसूचित जमातीच्या महिला सदस्या आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षणामुळे सभापतीपदाची लॉटरी लागली. अकोला पंचायतमध्ये वंचितकडे स्पष्ट बहुमत असल्यानंतरही केवळ अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून उमेदवार निवडून न आल्याने वंचितला सभापती पदापासून दूर रहावे लागणार आहे. दुसरीकडे उपसभापती पदासाठी वंचितकडे स्पष्ट बहुमत असल्याने वंचितला फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अकोला पंचायत समितीमध्ये सर्वाधित 11 सदस्य वंचितचे असून शिवसेनेचे पाच, भाजपचे तीन तर कॉंग्रेसचा एक सदस्य आहे. 

सभापती पदासाठी रविवारी निवडणूक

जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतींची पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितींमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुकीमुळे दिवाळीपूर्वीच पंचायत समितींमध्ये फटाके फुटणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare On Bjp: 'मोदीजी आम्हाला आटा पाहिजे, डाटा नाही', सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल

Pune Sextortion: धक्कादायक! पुण्यातील तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी सेक्सटॉर्शनचा दुसरा बळी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओही काढला
परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओही काढला
आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची; मतदार याद्यांवरुन राणे-देशपांडे यांच्यात जुंपली
आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची; मतदार याद्यांवरुन राणे-देशपांडे यांच्यात जुंपली
महंतांच्या गादीसाठी शिष्यांनी गुरूला संपवलं; अपहरण करून गळा घोटला, मृतदेह कालव्यात फेकून दिला
महंतांच्या गादीसाठी शिष्यांनी गुरूला संपवलं; अपहरण करून गळा घोटला, मृतदेह कालव्यात फेकून दिला
Video: 34 मजल्यांचे दोन टॉवर, माझ्याकडे डिझाईन; 2700 कोटी खिशात, धंगेकरांचे मुरलीधर मोहोळांवर गंभीर आरोप
Video: 34 मजल्यांचे दोन टॉवर, माझ्याकडे डिझाईन; 2700 कोटी खिशात, धंगेकरांचे मुरलीधर मोहोळांवर गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar funny dialogues : बुरा ना मानो दिवाली है, फनी दादांची फटकेबाजी, अजित पवार यांची कॉमेडी
Voter List Row: 'मतदार याद्यांमधल्या घोळावर' Uddhav Thackeray यांचा 'Action Mode', Raj Thackeray नंतर आता उद्धवजींचा मेळावा
Maharashtra Politics नाशकात BJP ला धक्का, संगीता गायकवाड 'मातोश्री'वर, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
Pawar vs Govt: 'सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही', Rohit Pawar यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
Stray Dog Menace: 'भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला', Jalna मध्ये 4 वर्षीय Pari Goswami चा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओही काढला
परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओही काढला
आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची; मतदार याद्यांवरुन राणे-देशपांडे यांच्यात जुंपली
आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची; मतदार याद्यांवरुन राणे-देशपांडे यांच्यात जुंपली
महंतांच्या गादीसाठी शिष्यांनी गुरूला संपवलं; अपहरण करून गळा घोटला, मृतदेह कालव्यात फेकून दिला
महंतांच्या गादीसाठी शिष्यांनी गुरूला संपवलं; अपहरण करून गळा घोटला, मृतदेह कालव्यात फेकून दिला
Video: 34 मजल्यांचे दोन टॉवर, माझ्याकडे डिझाईन; 2700 कोटी खिशात, धंगेकरांचे मुरलीधर मोहोळांवर गंभीर आरोप
Video: 34 मजल्यांचे दोन टॉवर, माझ्याकडे डिझाईन; 2700 कोटी खिशात, धंगेकरांचे मुरलीधर मोहोळांवर गंभीर आरोप
Gopichand Padalkar on Jayant Patil: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
Murlidhar Mohol & Ravindra Dhangekar: पुण्याचा जाग्यामोहोळ! धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं, जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती
पुण्याचा जाग्यामोहोळ! धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं, जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती
Sanjay Shirsat on Farmer Protest Video: घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Embed widget