(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Crime : अवैध धंद्याची तक्रार केल्याने दोन तरुणांवर तलवारीने वार; एकाचा मृत्यू, एक जखमी
Ahmednagar Crime : अवैध धंद्याची पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दोन तरुणांवर तलावारीने वार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.
Ahmednagar Crime : अवैध धंद्याची (Illegal Business) पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दोन तरुणांवर तलावारीने (Sword) वार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये (Ahmednagar) घडली आहे. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्याची तक्रार पोलिसांकडे केल्याच्या रागातून काल (19 जून) मध्यरात्री ही घटना घडली. ओंकार भागानगरे असं मयत युवकाचं नाव आहे तर शुभम पाडोळे हा या घटनेत जखमी झाला आहे.
दोन तरुणांवर तलवारीने हल्ला
बालिकाश्रम रस्त्यावर रुबाब कलेक्शनसमोर काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरु होते. या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात ओंकार भागानगरे या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली होती. याच त्याने ओंकार भागानगरे आणि शुभम पाडोळे या दोन तरुणांवर तलवारीने वार केले. या हल्ल्यात ओंकार भागानगरे याचा मृत्यू झाला तर एक शुभम पाटोळे जखमी झाला आहे.
मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींकडून तरुणांवर सपासप वार
मृत ओंकार भागानगरे आणि त्याचे मित्र त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी भागानगरे आणि पाडोळे यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. यामुळे एकच धावपळ उडाली. मित्र आणि नातेवाईंकांनी ओंकार भागानगरे आणि शुभम पाडोळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. तोपर्यंत भागानगरे याचा मृत्यू झाला होता. पाडोळे याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मध्यरात्री फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यातील जखमी शुभमला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अद्याप अटक नाही
या प्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार घोलप यांनी याबाबत फिर्याद दिली असून, गणेश हुच्चे, नंदु बोराटे आणि संदीप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत गणेश हुच्चे याचे अवैध धंदे असून या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन ओंकार भागानगरे याचा तलवारीने वार करुन खून केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
हेही वाचा
Crime: धक्कादायक! प्रियकरासाठी मोठ्या बहिणीकडून लहान बहिणीची हत्या, कोपरगाव तालुक्यात खळबळ