"भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा", सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर निशाणा
बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित होती. हे लोक संपूर्ण तयारीनुसार आले होते असं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर: राष्ट्रवादीच्या (NCP) जन्मामुळे राज्यात जाती जातीत भेद निर्माण झाला या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वक्तव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीका केली आहे. "आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा काहीही स्टेटमेंट करावे आणि आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण खुशाल आराम करावा, अशा पद्धतीने जी स्टेटमेंट करणारी माणसं असतात. त्यामुळे त्यांनी त्यावर फार बोलू नये पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा अडून मदत करणं थांबवावं", असा टोमणा सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. त्या अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकार बनवा आम्ही मोफत राम लल्लाचे दर्शन घडवू असं एका भाषणादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीकास्त्र सोडल आहे.गृहमंत्री काय रामलल्लाच्या वरचे झाले आहेत का? असा सवाल करत याच्या आधी काय लोकांनी रामलल्लाचे दर्शन केलेच नाही का? असं सुषमा अंधारे म्हणाले. तसेच भारतातले लोक हे देवदर्शन स्वतःच्या पैशाने करू शकत नाहीत का? देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे जर गृहमंत्री आणि पंतप्रधान जर या देशाला लाभत असतील तर हे मोठे दुर्दैव आहे. हे इतके सर्व शक्तिमान झाले का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशनला अंकित ठेवत आहेत आता काय राम लल्लाला पण अंकित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत ते फार मोठं दुर्दैव आहे असं म्हणत अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला.
बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित : सुषमा अंधारे
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनावेळी बीडमध्ये (Maratha Reservation Protest In Beed) झालेली जाळपोळ ही पूर्वनियोजित होती असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. जे लोक यात सहभागी होते त्यांच्यातील कित्येक जणांच्या हातात वॉकीटॉकी होते. त्यामुळे ही जाळपोळ पूर्वनियोजित होती. हे लोक संपूर्ण तयारीनुसार आले होते असं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात राडा; पोलीस अॅक्शन मोडमध्ये, परिसरात तणावपूर्ण शांतता