एक्स्प्लोर

'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!

Nilesh Lanke : निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखे पाटलांच्या टीकेला उत्तर दिले आहे. या बॅनरची अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा होत आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची (Ahmednagar Lok Sabha Constituency) जोरदार चर्चा झाली. शरद पवार गटाच्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव केला. सुजय विखेंचा पराभव करुन निलेश लंके हे जायंट किलर ठरले. तर अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात गाजला. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरुन (English Language) टीका केली होती.  मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. आता निलेश लंकेंच्या समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखेंना डिवचले आहे. 

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचे आव्हान दिले होते. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युतर निलेश लंके यांनी दिले होते. त्यांनतर संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. 

इंग्रजीत बॅनर लावून टीकेला उत्तर 

आता निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या कार्यालयासमोर इंग्रजीत बॅनर लावून एकप्रकारे टीकेला उत्तर दिले आहे. या बॅनरवर 'आय निलेश ज्ञानदेव लंके, डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन, अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहे. आता या बॅनरवरून लंके समर्थकांकडून काय प्रत्युत्तर येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

Nilesh Lanke Meets Nitin Gadkari: निलेश लंकेंच्या खांद्यावर नितीन गडकरींचा हात, आस्थेने विचारपूस, दिलखुलास संवाद!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP MajhaSachin kharat On Deekshabhoomi :  दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंग होणं अत्यंत चुकीचं : सचिन खरातAmbadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Embed widget