Rohit Pawar Vs Nitesh Rane : मला कुणी नितेश राणे म्हणू नये हीच विनंती, रोहित पवार यांचा टोला
Rohit Pawar on Nitesh Rane : एकवेळ मला संजय राऊत म्हणा पण नितेश राणे कुणी म्हणू नका, अशी माझी विनंती आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
Rohit Pawar on Nitesh Rane : एकवेळ मला संजय राऊत (Sanjay Raut) म्हणा पण नितेश राणे (Nitesh Rane) कुणी म्हणू नका, अशी माझी विनंती आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लगावला आहे. नितेश राणे असं मला कोणी म्हटलं नाही, याचा मला अभिमान आहे, असंही रोहित पवार म्हणाले. ते अहमदनगरमध्ये (Ahmednagar) बोलत होते.
रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली,” असा आरोप अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केला होता. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार म्हणजे सुळे गटाचे पप्पू आहेत, संजय राऊत यांनी जसं बोलून बोलून शिवसेना संपवली तसंच रोहित पवारांनी बोलत राहावं म्हणजे अजित पवारांना त्याचा फायदा होईल असं म्हणत नितेश राणे यांनी रोहित पवार आणि संजय राऊत यांची तुलना केली होती. यावर बोलताना रोहित पवारांनी नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मला भीती होती की कुणी मला नितेश राणे म्हणेल की काय : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले की, "संजय राऊतच बोललेत ना, मला भीती होती की कुणी मला नितेश राणे म्हणेल की काय. नितेश राणे मला म्हटलं नाही, याचा अभिमान माझ्यासारख्याला आहे. कारण आज राजकीय दृष्टिकोनातून वातावरण एकदम खालच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी काही प्रमाणात नितेश भाऊ सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे कुणाबद्दलही माझं तुम्ही जोडा पण तुमच्याबद्दल तरी जोडू नका अशी विनंती मी करतो."
रोहित पवार सुळे गटाचा पप्पू, तोच सुळे गटाला संपवणार : नितेश राणे
रोहित पवार हे त्यांचे पक्षाचे राहुल गांधी आहेत. प्रत्येक पक्षाचा पप्पू असतो. काँग्रेसचा पप्पू राहुल गांधी आहे, उबाठाचा पप्पू आदित्य ठाकरे आहे आणि सुळे गटाचा पप्पू रोहित पवार आहे. जसं संजय राऊत यांनी ठाकरे गटाला संपवत आहेत, तसंच रोहित पवारांनी सुळे गट संपवण्याची सुपारी घेतली आहे. म्हणून रोहित पवारांनी बोलत राहावं त्याचा फायदा अजित पवारांना मोठ्या प्रमाणात होईल, असं नितेश राणे म्हणाले होते. तसंच रोहित पवार यांनी पहिलं आपलं घर सांभाळावं असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला होता.
VIDEO : Rohit Pawar On Nitesh Rane : मला संजय राऊत म्हणा पण कुणी नितेश राणे म्हणू नका, माझी विनंती
हेही वाचा