(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke Facebook Post : येणाऱ्या दोन दिवसात सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल : निलेश लंके यांची फेसबुक पोस्ट
Nilesh Lanke Facebook Post : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक निलेश लंके यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे. "येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल."
Nilesh Lanke Facebook Post : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुसरा महाभूकंप केला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अहमदनगरच्या (Ahmednagar) पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील त्यांच्यासोबत होते. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान या सर्व आमदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे कट्टर समर्थक निलेश लंके यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे. "येणाऱ्या दोन दिवसात सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल."
निलेश लंके यांची फेसबुक पोस्ट
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मा.अजितदादा पवार आणि मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते आणि कुटुंब प्रमुख आहेत. ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!" अशी पोस्ट निलेश लंके यांनी केली आहे.
अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप
महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) पुन्हा एकदा शक्तीशाली राजकीय भूकंप झाला आहे. मागीलवेळी भाजपकडून (BJP) टार्गेट उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. भाजपला अखेर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात यश आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 30 आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केली असून त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.
हेही वाचा