
Shirdi SaiBaba Mandir : शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल
Shirdi SaiBaba Mandir : औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad) शिर्डीच्या (Shirdi) साई बाबा मंदिर (Saibaba Mandir) विश्वस्त मंडळ (Board Of Trustee) बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Shirdi SaiBaba Mandir : राज्यातील प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या (Shirdi) साई बाबा मंदिर (Saibaba Mandir) विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Highcourt) महत्वाचा निकाल दिला असून विश्वस्त मंडळ (Board Of Trustee) बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय येत्या दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे अशा सूचनाही खंडपीठाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेले शिर्डी साई मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांना हार फुले घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यावेळी साईबाबा मंदिर परिसरात मोठे आंदोलन करण्यात आले होते. राज्यभर हा मुद्दा चर्चेत होता. त्याशिवाय या संदर्भात देखील एक महिन्याच्या कालावधीत याबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. हा मुद्दा चर्चेत असताना आता शिर्डी साई मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद खंडपीठाने धक्कादायक निर्णय दिला आहे. हे विश्वस्त ,मंडळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याच्या सूचना देखील खंडपीठाने दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा शिर्डी साई बाबा संस्थान मंडळ चर्चेत आले आहे.
दरम्यान गेल्या सहा महिन्यापूर्वी शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मात्र तेव्हापासूनच या विश्वस्त मंडळाला विरोध करण्यात येत होता. साई बाबा मंदिर संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात यात होता. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ नेमल्यापासून येथील उत्तरामराव शेळके यांनी औरगांबाद खंडपीठात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार विश्वस्त मंडळ साईबाबा मंदिर संस्थानच्या नियमाच्या अधीन नसल्याने बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान या च पार्श्वभूमीवर गेल्या तीन चार महिन्यापासून याबाबतची केस औरंगाबाद खंडपीठात होती, आज याबाबत कोर्टाने निर्णय देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.
दोन महिन्यात नवे विश्वस्त मंडळ
दरम्यान गेल्या चार ते पाच महिन्यापासून औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी सुरु होती. अखेर आज औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून सभासद नेमण्यात येत असून 16 लोकांना या मंडळावर निवडण्यात येते.
विश्वस्त मंडळ घटनाबाह्य?
गेल्या सहा महिन्यापूर्वी शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मात्र तेव्हापासूनच या विश्वस्त मंडळाला विरोध करण्यात येत होता. साई बाबा मंदिर संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ नेमल्यापासून येथील उत्तरामराव शेळके यांनी औरगांबाद खंडपीठात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार विश्वस्त मंडळ साईबाबा मंदिर संस्थानच्या नियमाच्या अधीन नसल्याने बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन चार महिन्यापासून याबाबतची केस औरंगाबाद कोर्टात होती, आज याबाबत खंडपीठाने निर्णय देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
