एक्स्प्लोर

Ahilyanagar Acid Attack : 'मी त्या चिमुकलीच्या आईशी बोलले; त्या हरामखोराला शोधण्यासाठी...', आहिल्यानगरमधील मुलीवरील ॲसिड हल्ल्यावरती चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

Ahilyanagar Acid Attack : चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, शासन कोणतीही तडजोड करणार नाही, असं म्हटलं आहे.

संगमनेर (जि. अहिल्यानगर) : संगमनेरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे, संगमनेर तालुक्यात इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ॲसिडसदृश ज्वलनशील पदार्थ  (Ahilyanagar Acid Attack Case) फेकला. या घटनेमध्ये मुलीचा चेहरा व हात गंभीर भाजला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला आहे. पीडित मुलगी कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील एका खेडेगावात शिक्षण घेते. ती नातेवाईकाच्या घरी राहते. दुपारी ती शाळेतून सायकलवर घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे ती जोरत ओरडली. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी तिला गावातील खासगी रुग्णालयात हलविले, सध्या तिची प्रकृती स्थिर  (Ahilyanagar Acid Attack Case)आहे, या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. तर भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, शासन कोणतीही तडजोड करणार नाही, असं म्हटलं आहे. (Ahilyanagar Acid Attack Case)

त्या हरामखोराला शोधण्यासाठी दहा विशेष पथके तैनात

घटनेबाबत प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या, संगमनेर तालुक्यातील सहावी शिकणाऱ्या एका छोट्या मुलीवर शाळेतून घरी जात असताना झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या चिमुकलीच्या आईशी मी स्वतः बोलले आहे, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिच्यावरती उपचार सुरू आहेत, तिला सर्वोत्तम वैद्यकीय मदत मिळेल याची शासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे, तिच्या कुटुंबाला देखील आवश्यक ती मदत केली जाईल ती लवकर बरी व्हावी हीच प्रार्थना आहे, या घटनेबाबत मी पोलीस अधीक्षकांशी देखील बोलले आहेत पोलीस प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली असून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक एस पी घारगे घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे, त्या हरामखोराला शोधण्यासाठी दहा विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, आणि त्याला लवकरच पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री विखे पाटील या घटनेवर ती लक्षात ठेवून आहेत, संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या जात आहेत पालकांच्या सुरक्षेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका झिरो टॉलरन्स अशी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

मुलीची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?

शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असून अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. हल्ला करणारा आरोपी अनोळखी असल्याची पहिली प्रतिक्रिया हल्ला झालेल्या मुलीने दिली आहे. तर नातेवाईकांनी आरोपीला पकडून कडक शासन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ  आज ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. वडगावपानमधील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होणार आहे. (Ahilyanagar Acid Attack Case)

मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा

लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा झाली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या असून आरोपीला पकडण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी विविध पथक स्थापन करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget