एक्स्प्लोर

Shivajirao Kardile Passes Away: मोठी बातमी: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shivajirao Kardile Passes Away: राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Shivajirao Kardile Passes Away: राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता. त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.

Shivajirao Kardile Passes Away: शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास:

शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. 

Shivajirao Kardile Political Profile: भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास

1984-95 बुऱ्हानगर ता. नगर सरपंच.
1990 बानेश्वर शैक्षणिक संस्था स्थापना.
1995 नगर -नेवासा अपक्ष आमदार.
1999 नगर - नेवासा अपक्ष आमदार.
2003-04 राज्यमंत्री, मत्स्य व बंदरे विकास
2004 राष्ट्रवादी , नगर- नेवासा आमदार
2007 अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक.
2008-09 अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमन.
2009 नगर दक्षिण खासदार राष्ट्रवादी उमेदवारी पराभव.
2009 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी आमदार.
2014 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार
2019 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव.
2023 चेअरमन अहिल्यानगर जिल्हा बँक.
2024 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी

 

Rohit Pawar: रोहित पवारांकडून शोक व्यक्त

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली, असे त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MNS Deepotsav 2025: मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करणार?

Solapur News: भाजपमध्ये मेगा भरती सुरू; सोलापुरातील चार माजी आमदार करणार भाजपप्रवेश; फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्तं खलबतं

महत्त्वाच्या बातम्या

Lokshahir Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Embed widget