एक्स्प्लोर

Sujay Vikhe Patil vs Nilesh lanke : लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंचं आव्हान वाटतं का? सुजय विखे पाटलांचं रोकठोक उत्तर!

Sujay Vikhe Patil on Nilesh Lanke Resign : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुध्द निलेश लंके लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यावर सुजय विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sujay Vikhe Patil on Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांनी शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar South Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यास निलेश लंके इच्छुक आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढणार आहे. भाजपकडून (BJP) अहमदनगरच्या जागेवर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुध्द निलेश लंके लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.   

सुजय विखे पाटील म्हणाले की, लंकेंनी राजीनामा का दिला? तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. त्यांनी सभेदरम्यान जे आरोप केले त्याचे उत्तर मीडियाच्या माध्यमातून नाही तर सभेतून देऊ. आमचे कार्यकर्ते त्यांच्या आरोपांना उत्तर देतील, असं त्यांनी म्हटले आहे. 

कोणी न कोणी उमेदवार समोर असणारच होता

निलेश लंके यांची मविआमधून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यावर सुजय विखे पाटील म्हणाले की, कोणी न कोणी उमेदवार समोर असणारच होता. त्यामुळे आम्ही केलेल्या कामावर जनतेसमोर जाणार आहोत, असं सुजय विखेंनी म्हटले आहे. सोबतच काही वेगळं अनपेक्षित झालं आहे असं नाही, उमेदवार कुणीही असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो विकास झाला त्याच्या आधारावरच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, असं सुजय विखे म्हणाले.

मी माझी रणनीती बदलत नाही

निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याने काही आव्हान वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना सुजय विखे म्हणाले की, समोरून कुणीही उमेदवार असला तरी मी माझी रणनीती बदलत नाही, मी माझ्या कामाच्या आधारावर जनतेसमोर जाणार आहे मी कधीही कुणाला कमी लेखत नाही आणि समोर कोण आहे त्यावरून रणनीती बदलत नाही. मी जी रणनीती ठरवली आहे. त्यानुसार मी काम करतो, असं सुजय विखेंनी म्हंटले आहे.

सुजय विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांचा टोला 

सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात मैदानात उतरणार असल्याचे बोलले जाते. यावरून सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता निशाणा साधलाय. तर मागच्या वेळेस हे सगळे प्रयोग झाले असून सगळे मैदानात उतरून भाषणे झाले, मात्र जे माणसं आता मैदानात उतरणार आहे. त्यांनी एकातरी माणसाचे जीवन बदलण्यासाठी एखादं काम केलं असेल तर त्यांचे ऐकणार आहे, असा टोमणा सुजय विखे यांनी लगावला आहे.

सगळे पंतप्रधानांकडे पाहून काम करणार 

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील काहींनी नाराजी व्यक्त केली. यावर सुजय विखे पाटील म्हणाले की, निवडणूकीला अजून भरपूर वेळ आहे. अजून फॉर्म भरायचे आहेत. माघारीपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. ही महायुती केवळ पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी झालेली महायुती आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं एकमत आहे. कोणता उमेदवार आवडू अगर न आवडू किंवा एखाद्या उमेदवाराबद्दल काही मतभेद जरी असले तरी सगळे जण पंतप्रधानांकडे पाहून काम करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

आणखी वाचा 

Nilesh Lanke resigns as MLA : दादा मला माफ करा, हुंदका दाटलेल्या निलेश लंकेंनी आमदारकी सोडली, नगरमधून लोकसभा लढवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget