एक्स्प्लोर

Ajit Pawar : तुम्हाला निलेश लंकेंनी पाठवलं का? भर सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, नेमकं काय घडलं?

Maharashtra Assembly Elections 2024 : पारनेर येथील बाजार तळ येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

पारनेर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला. सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा पराभव करून निलेश लंके हे खासदार झाले. आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून अजित पवार हे आज निलेश लंके यांच्या होम ग्राउंडवर दाखल झाले. पारनेर येथील बाजार तळ येथे कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले.  निलेश लंके यांनी तुम्हाला पाठवले आहे का? असे अजित पवारांनी म्हटले. 

कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, महायुती म्हणून 288 उमेदवार उभे करणार आहोत. समोरचे त्यांचा त्यांचा भाग म्हणून काम करतील. वसंत झावरे , निलेश लंके, विजय औटी यांनी या पूर्वी या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. जो तो ज्याचा त्याचा पद्धतीने काम करत आहे. कुणाच्या नावाने घोषणा दिल्या तर त्याला तिकीट मिळणार नाही, असे म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी घोषणा देणाऱ्यांना खडसावले. 

घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले

अजित पवारांच्या भाषणा दरम्यान 'पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या' असं म्हणत बॅनर झळकवण्यात आले. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर आणि कार्यकर्त्यांनी हे बॅनर झळकवले. यानंतर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले. निलेश लंके यांनी तुम्हाला पाठवले आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. 

अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा 

दरम्यान, डी झोन मध्ये महिलांना बसण्यासाठी स्वतः अजित पवारांनी जागा करण्यासाठी पोलिसांना सूचना दिली. तर सभास्थळी आणलेल्या वेगवेगळ्या स्थानिक नेत्यांचे फोटो अजित पवारांनी खाली घ्यायला सांगितले. अजित पवार यांनी विर्धाकांवर हल्लाबोल देखील केला. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी दिली नाही तर तो देश मागे पडतो. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना मी महिलांचा विचार केला. म्हणून आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणायचं ठरवलं. विरोधकांनी त्यावरही टीका केली, विरोधक वाटेल ते बोलले, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर पारनेर तालुका दुष्काळी भाग आहे. पण सुप्यात एमआयडीसी आली, बदल झाला. पण, पारनेरच्या सुपा एमआयडीसीत गुंडगिरी आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. 

आणखी वाचा 

मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेतो, लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, निधीत वाढ करणार : अजित पवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
Weather Update: विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
मुंबईत झांसी की राणी तलावात शाळकरी मुलगा बुडाला; भाजपचे माजी खासदार बसले धरणे आंदोलनाला
मुंबईत झांसी की राणी तलावात शाळकरी मुलगा बुडाला; भाजपचे माजी खासदार बसले धरणे आंदोलनाला
Repo Rate : आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
Weather Update: विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
मुंबईत झांसी की राणी तलावात शाळकरी मुलगा बुडाला; भाजपचे माजी खासदार बसले धरणे आंदोलनाला
मुंबईत झांसी की राणी तलावात शाळकरी मुलगा बुडाला; भाजपचे माजी खासदार बसले धरणे आंदोलनाला
Repo Rate : आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा
जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा
सेल्फी अन् रिल्ससाठी जीवघेणा स्टंट, सज्जनगडावरील कड्यांवर उभे राहून पर्यटकांचे फोटोशूट
सेल्फी अन् रिल्ससाठी जीवघेणा स्टंट, सज्जनगडावरील कड्यांवर उभे राहून पर्यटकांचे फोटोशूट
कश्मीर फाइल्सप्रमाणेच द मालेगाव फाइल्स सिनेमा आला पाहिजे; भाजपच्या मेधा कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
कश्मीर फाइल्सप्रमाणेच द मालेगाव फाइल्स सिनेमा आला पाहिजे; भाजपच्या मेधा कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार
Embed widget