एक्स्प्लोर

Ahmednagar News : पती थाटामाटात दुसरं लग्न करत असल्याचं समजलं, पत्नी मुलाला घेऊन लग्न मंडपात पोहोचली अन्...

Ahmednagar News : लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला.

अहमदनगर : पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर (Marriage) चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची वरात थेट पोलीस ठाण्यात नेली. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात ही घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेला माहिती मिळाली की आपला पती विशाल पवार हा अहमदनगर इथे जाऊन दुसरे लग्न थाटामाटात करत आहे. ही माहिती समजताच पत्नीने आपला बारा वर्षांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले. नगरमध्ये आल्यानंतर संबंधित मंगल कार्यालयाचा पत्ता शोधून बरोबर लग्न लागायच्या आधी काही मिनिटे आपल्या पती समोर पोहोचली आणि तिथून पुढे या लग्नात चांगलाच राडा झाला. पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलेच चोपले. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना सुद्धा काय झाले हे समजत नव्हते. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीने पोलिसांसह लग्नात एन्ट्री मारली.

दरम्यान नववधूचे वडील आणि पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांमध्येही चांगलाच राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत पहिली पत्नी तिचा पती यांना पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला असून कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना सुद्धा आपल्या पतीने दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करुन एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र, त्या ठिकाणी वेळेत पोहोचल्याने तो लग्न सोहळा थांबवण्यात आला. 

पहिल्या पत्नीपासून लग्न लपवण्यासाठी अहमदनगरमध्ये लग्न करण्याचा प्लॅन

पतीने फसवून दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला असल्याबद्दलचा गुन्हा अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विशाल गोरखनाथ पवार याच्याविरुद्ध भादंवि कलम 494 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विशाल पवार हे जालना जिल्ह्यात राहणारे असून त्यांची होणारी नववधू ही सुद्धा जालना जिल्ह्यात राहणारी आहे. मात्र दोघांच्या कुटुंबांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर सोडून अहमदनगर जिल्ह्यात लग्न करण्यामागचे कारण अखेर समोर आले. पहिल्या पत्नीपासून लग्न लपवण्यासाठीच ते अहमदनगरमध्ये करण्याचा प्लॅन दोन्ही कुटुंबांनी आखला होता. मात्र अखेर पहिल्या पत्नीने येऊन पतीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget