![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nilesh Lanke : अहमदनगरला EVM ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न, आता निलेश लंकेंनी घेतला मोठा निर्णय
Ahmednagar Lok Sabha Election : ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या अहमदनगरच्या स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी केल्याचा प्रयत्न निलेश लंके यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
![Nilesh Lanke : अहमदनगरला EVM ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न, आता निलेश लंकेंनी घेतला मोठा निर्णय ahmednagar lok sabha unknown man trying to damage strong room where evm machines kept nilesh lanke took big decision Maharashtra Marathi News Nilesh Lanke : अहमदनगरला EVM ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न, आता निलेश लंकेंनी घेतला मोठा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/c0abf9c2b04cf3ed021c02635cf2ae6b1716368361225923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एक व्हीडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगरुममध्ये (Strongroom) ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम (EVM) मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे मोठी खळबळ उडाली असून आता निलेश लंकेंनी मोठा निर्णय घेतला आहे.
निलेश लंके यांनी अहमदनगर स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. त्यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय, असे त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार : निलेश लंके
अहमदनगर येथील EVM सुरक्षाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निलेश लंके यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री घडलेल्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी लंके यांनी बोलल्याचे सांगितलं असून रात्री त्यांनाही संबंधित व्यक्ती कोण आहे हे माहित नव्हतं असं लंके यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराबाबत आपण रीतसर तक्रार करणार आहोत, अशी माहिती निलेश लंके यांनी दिली आहे.
निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांचा सवाल
दरम्यान, ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाबाहेर लंके यांचे कार्यकर्ते देखील लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला विचारपूस केली असता, त्याने आपण तांत्रिक विभागातील असल्याची माहिती दिली. मात्र, गोदामाच्या बाहेरील केंद्रीय सुरक्षा विभाग, राज्य सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता थेट गोदामाच्या शटरजवळ जातेच कशी? असा सवाल लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला. संबंधित व्यक्ती रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी त्या परिसरात आल्याची माहिती देण्यात आलीये. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून या निमित्ताने ईव्हीएम ठेवलेल्या गोदामच्या सुरक्षेबाबत लंके समर्थकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)