एक्स्प्लोर

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच, बुलढाणा दुर्घटनेनंतर आज भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील बस दुर्घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

Ahmednagar Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघातांची मालिका सुरु आहे. बुलढाण्यातील बस दुर्घटना (Buldhana Bus Accident) ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघातात (Ahmednagar Car Accident) तिघांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर आज पुन्हा अपघात होऊन तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहमदनगरमधील कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील धोत्रे गावाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कारचा भीषण अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू

भरधाव वेगाने येणारी कार गाडी डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचं समोर येत आहे. या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे निघालेल्या गाडीला अपघात झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बुलढाणा दुर्घटना ताजी असताना पुन्हा अपघात

बुलढाण्याजवळ शनिवारी मध्यरात्री झालेला अपघात (Buldahana Bus Accident) हा समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. या बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमधील 32 प्रवाशांपैकी 8 जण सुदैवाने बचावले. मध्यरात्री दीड वाजता  समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले.

समृद्धी महामार्गावरच कोपरगावात शुक्रवारीही तिघांचा मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर कोपरगावात भीषण अपघात झाला होता. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील अपघातात तीन जण ठार तर 5 जखमी झाले. क्रूझर जीप आणि आयशरच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. पती-पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे. संतोष राठोड (वय 35) , वर्षा राठोड (वय 29) आणि अवनी राठोड (वय दीड वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. हे जालना जिल्ह्यातील मंठा गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samruddhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारकडून 7 लाखांची मदत, चौकशीचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget