नगर-पुणे रोडवर ST बसला भीषण आग, संपूर्ण बस जळून खाक, चालकानं प्रसंगावधान साधल्यानं मोठा अनर्थ टळला
नगर-पुणे रोडवर एसटी बसला भीषण आग (ST Bus Fire) लागल्याची घटना घडली आहे. ही बस पुण्याकडे (Pune) जात होती. यावेळी एसटी बसला भीषण आग लागून बस संपूर्ण जळून खाक झाली आहे.

Ahilyanagar : नगर-पुणे रोडवर एसटी बसला भीषण आग (ST Bus Fire) लागल्याची घटना घडली आहे. ही बस पुण्याकडे (Pune) जात होती. यावेळी एसटी बसला भीषण आग लागून बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कशामुळं लागली याचे कारण मात्र अस्पष्ट असल्याची माहिती मिळत आहे.
चालकानं प्रसंगावधान राखल्यामुळं अनर्थ टळला
चालकानं प्रसंगावधान राखत एसटी रोडच्या कडेला घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एसटी बस जळत असल्यामुळे नगर- पुणे महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. सध्या या रस्त्यावर धीम्या गतीनं वाहतूक सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एस टी बसला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजुला उन्हाचा पारा चांगलाच वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी रस्त्यांचे देखील प्रश्न आहेत. त्यामुळं काही ठिकाणी एसटीचे अपघात देखील होतात.
पालघरमध्ये दोन दुचाकींचा अपघात, दोघांचा मृत्यू
महत्वाच्या बातम्या:
Pune Hinjwadi Bus Fire: हिंजवडीतील बसला आग लावलेल्या चालकानं पगार थकवल्याचं सांगितलं कारण; कंपनी मालकाने केला मोठा खुलासा, म्हणाले, 'सर्व पैसे...'
























