'माझ्याकडे कोणी येत नाही, काम देण्यासाठी विचारत नाही', सचिन पिळगांवकर यांनी व्यक्त केली खंत!
अभिनेता सचिन पिळगांवकर यांचा नवरा माझा नवसाचा-2 हा चित्रपट आला होता. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. मात्र त्यांनी मला कोणी कामासाठी विचारणा करत नाहीये, अशी खंत पिळगांवकर यांनी व्यक्त केली होती.

Sachin Pilgaonkar : अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी आपला काळ चांगलाच गाजवला. गायन, अभिनय, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी यशस्वी पद्धतीने काम करून दाखवलंय. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक मराठी सिनेमे आजही तेवढेच चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांनी अभिनाच्या प्रदेशात साकारलेली पात्रेही आज तेवढीच जिवंत वाटतात. दरम्यान, सचिन पाळगांवकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात त्यांनी मला कोणी अभियन करण्यासाठी विचारणाच करत नाही, असं ते म्हणाले होते.
माझ्याकडे कोणी येतही नाही
मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाच्या ट्रेलर सचिन पाळगांवकर यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. याच मुलाखतीत त्यांनी अभिनय करण्यासाठी काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांचा आगामी चित्रपट कोणता आहे, ते कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत? असे त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना "सध्यातरी आता मी पडद्यावर येणार नाही. कारण सध्यातरी तसं काही नाहीये. मला कोणी अभिनेता म्हणून घेतही नाहीये. माझ्याकडे कोणी येतही नाही. तुम्ही आमच्याकडे अभिनेता म्हणून काम करा, असं मला कोणी सांगतही नाही. का येत नाहीत, हे मला माहिती नाही. मी अभिनय सोडला आहे, असं कदाचित त्यांना वाटत असेल. पण तसं नाहीये. ती चुकीची समजूत आहे, गैरसमज आहे," अशी खंत सचिन पिळगांवकर यांनी व्यक्त केली होती.
नवरा माझा नवसाचा-3 येणार का?
सचिन पिळगांवकर यांचा नवरा माझा नवसाचा-2 हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमवला. त्यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग येणार का? असे विचारले जात आहे. यावरह सचिन पिळगांवकर यांनी भाष्य केले होते. नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा तिसरा भाग येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. "नवरा माझा नवसाचा-3 हा चित्रपट यायला हवा, असे लोकांना वाटत असेल तर मी नक्कीच प्रयत्नशील असेल. प्रेक्षकांना जे हवं आहे, प्रेक्षकांना जी अपेक्षा आहे ती पूर्ण करायची ऊर्जा मला गणपती बप्पा नेहमीच देत असतोय. मला गणपती बाप्पााकडून नवरा माझा नवसाचा-3 करण्याचा आदेश कधी मिळतोय, याची मी वाट पाहतोय. तो आदेश मिळेल याची मला खात्री आहे," असे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले होते.
View this post on Instagram
नवरा माझा नवसाचा-2 सुपरहिट
दरम्यान, नवरा माझा नवसाचा-2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकूण 8 कोटी रुपये खर्च आला होता. तर प्रदर्शनानंतर या चिपटाने 23 दिवसांत 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमला होता. म्हणजेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, हेमल इंगळे, सुप्रिया पिळगांवकर आदी दिग्गज कलाकार होते.
हेही वाचा :
छावा चित्रपटात 'तानाजी'ची दिसणार एन्ट्री; अजय देवगणवर सोपवली आगळी-वेगळी जबाबदारी!
Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचा बोल्ड अंदाज; नव्या फोटोंने वाढवलं इंटरनेटचं तापमान!























