एक्स्प्लोर

Bhandara Crime: मन सुन्न करणाऱ्या भंडारा सामुहिक अत्याचारातील दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका; आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, प्रकरण नेमकं काय?

Crime News : भंडाऱ्याच्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका, आता भंडारा पोलीस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागणार आहेत.  

Bhandara Crime News : भंडारा : समाजमन सुन्न करणाऱ्या भंडाऱ्याच्या (Bhandara Crime) सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला. याप्रकरणी बरेच दिवस न्यायालयात खटला सुरू होता. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात (Bhandara District Sessions Court) फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण सुरू होतं. आता याप्रकरणी न्यायालयानं निकाल दिला असून  दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाच्या धक्कादायक निकालानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आरोपींवर लावण्यात आलेले आरोप भंडारा पोलीस न्यायालयात संशयाच्या पलिकडे जाऊन सिद्धच करू शकले नाहीत. पीडितेला न्याय मिळावी, यासाठी आता भंडारा पोलीस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागणार आहेत.  

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एक 35 वर्षीय मानसिक संतुलन बिघडलेली महिला घरून निघून गेली होती. ती एकटीच असल्याची संधी साधून एका वाहनचालकानं तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं जंगलात नेलं आणि तिथे सतत तिच्यावर दोन दिवस अत्याचार केला. त्यानंतर तिला भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत सोडून दिलं. त्यानंतर ती महिला कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हाळमोह लगत असलेल्या धर्मा धाब्यावर पोहोचली होती. तिथं असलेल्या टायर पंक्चर दुकानदार आणि गावातील अन्य एका अशा दोघांनी पीडितेला शेतात नेलं. त्यानंतर मध्यरात्री तिच्या सामुहिक बलात्कार केलेला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यात आला. या सामूहिक अत्याचार प्रकरणाचा भंडारा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राजेश अस्मार यांनी निकाल देताना पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आता या प्रकरणात भंडारा पोलीस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागणार आहे. 

नेमकं काय घडलेलं? 

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ही पीडित महिला 29 जुलै 2022 ला एकटीच घरून निघाली होती. यावेळी ती एकटीच असल्याची संधी साधून गोरेगाव येथील एका वाहन चालकानं तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं. त्यानंतर तिच्यावर गोंदिया जिल्ह्यातील जंगलात आणि वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवस सातत्यानं अत्याचार केला. 31 जुलैला पीडितेला भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत सोडून चालक तिथून पसार झाला. त्यानंतर ही पीडिता कराधा पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळमोह येथील धर्मा धाब्यावर पोहोचली. या धाब्यावर टायर पंक्चरचं दुकान असलेला एजाज अन्सारी आणि लुक्का उर्फ अमित सार्वे या दोघांनी तिच्यावर शेतशिवारात नेत अमानवीय सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिला बेशुद्ध आणि विवस्त्र अवस्थेत कन्हाळमोहच्या उड्डाणपुलालगत सोडून पसार झालेत. 1 ऑगस्टला ही घटना उघडकीस आल्यानंतर कारधा पोलिसांनी संशयावरून लुक्का आणि अन्सारी या दोघांना अटक केली. 

दरम्यान, मानसिक संतुलन बिघडलेल्या पीडितेवर सर्वप्रथम भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि त्यानंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारनं एसआयटी नेमली होती. मात्र, मानसिक संतुलन बिघडलेल्या पीडीतेनं वेळोवेळी तिसऱ्या अत्याचार करणाऱ्या आरोपींबाबत अधिक माहिती तपास यंत्रणेला दिली नाही. या प्रकरणाचा दोषारोपपत्र भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राजेश अस्मार यांनी याबाबत 60 साक्ष पुरावे तपासले आहेत. मात्र, पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या विरोधात न्यायालयात संशयाच्या पलीकडे जाऊन आरोप सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे न्यायाधीशांनी साक्ष पुरवावे तपासल्यानंतर दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकाला विरोधात आता भंडारा पोलीस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 90 दिवसाच्या आत अपील करणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Embed widget