एक्स्प्लोर

कारने ऑटो रिक्षाला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा मृत, चार गंभीर

औरंगाबाद-जालना महामार्गावर औरंगाबादहून जालन्याकडे चाललेल्या कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. हा अपघात एवढा भीषण होता की कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा हवेत उडाली. सोबतच रिक्षातील लोक देखील काही फुट वर हवेत उडाले.

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना महामार्गावर ऑटो-रिक्षा आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. औरंगाबादहून जालन्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या टोयोटा कार चालकाचा ताबा सुटला आणि कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकली. यामध्ये रिक्षात बसलेले एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. मृतक सगळेच जालन्यातील रहिवासी आहेत. हा अपघात बदनापूरपासून 8 किमी अंतरावर घडला. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. तसेच अपघातातील चार जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औरंगाबाद-जालना महामार्गावर औरंगाबादहून जालन्याकडे चाललेल्या कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. हा अपघात एवढा भीषण होता की कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा हवेत उडाली. सोबतच रिक्षातील लोक देखील काही फुट वर हवेत उडाले. औरंगाबाद-जालना मार्गावर हा अपघात आज सकाळी 9.45 च्या सुमारास झाला. औरंगाबाद-जालना रोडवरील शेकटा गावाजवळ हा अपघात झाला. माहितीनुसार आज (बुधवार) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जालना येथून निघालेला अपेरिक्षा औरंगाबाद दिशेकडे शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंप समोरून जात होता. त्याच वेळी औरंगाबाद दिशेने भरधाव वेगाने येणारी कारदुभाजकावरून विरुद्ध दिशेला येऊन रिक्षावर वेगाने धडकली. या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशी चिरडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget