एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवशाही-खाजगी बसची घाटात धडक, बस दरीत न गेल्याने मोठा अपघात टळला
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणाहून सुमारे हजार ते बाराशे फुट खोल दरी होती. अपघातानंतर हा संपूर्ण घाट सुमारे साडेतीन तास बंद होता. नंतर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली.
सातारा : नशीब बलवत्तर असणं म्हणजे काय असतं याचा प्रत्यय आज महाबळेश्वर घाटातील अपघातातून समोर आला. महाबळेश्वर वाई रोडवरील पसरणी घाटातून खाली येणाऱ्या खाजगी बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी वेगाने घाटातून खाली येत होती. गाडीच्या वेगावरुन काहीतरी विपरीत घडले आहे, असे दिसत असतानाच ही खाजगी बस समोरुन येणाऱ्या शिवशाही बसवर जोरात आदळली आणि बस दरीच्या कोपऱ्यावर जोरात उलटली. या अपघातात दोन्ही बसमधील सुमारे पन्नास पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले. यातील 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याच सांगितलं जातं आहे.
नशीब बलवत्तर म्हणून ही बस दरीत जाता जाता वाचली आणि कित्येक प्रवाशांचे प्राण वाचले. पुणे येथून महाबळेश्वर येथे लग्न सोहळ्यासाठी आलेली खाजगी बस कार्यक्रम संपवून पुण्याकडे जात होती. दुपारी ही बस पसरणी घाट उतरत असताना चालकाचा वाहनावरील तोल सुटला. त्यातूनही चालकानं काही वळणं सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या शिवशाही बसवर ही खाजगी बस आदळली.
अपघातानंतर ही खाजगी बस दरीच्या कोपऱ्यावर उलटली. स्थानिक नागरिक, अनेक सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते आणि ट्रेकर्सनी या खाजगी बसमधून जवळपास 28 जखमींना बाहेर काढले. तर शिवशाही बसमधीलही जवळपास 26 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. या सर्व जखमींवर पाचगणी वाई या भागातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. विशेष म्हणजे खाजगी बसमधील आईच्या मांडीवरचे सहा महिन्याचे बाळ फेकले गेले होते. मात्र तेही सुखरुप असून त्याच्यावरही किरकोळ उपचार करण्यात आले.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणाहून सुमारे हजार ते बाराशे फुट खोल दरी होती. अपघातानंतर हा संपूर्ण घाट सुमारे साडेतीन तास बंद होता. नंतर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement