एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017
- गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची 'मातोश्री'कडे पाठ, शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवसैनिकांचीही तुरळक गर्दी https://goo.gl/BMn5T7
- गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा, विदर्भाची पंढरी शेगावातही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी https://goo.gl/PAaT61
- साईचरणी 25 हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्तांना चांदीचं नाणं देणार, साई संस्थानचा निर्णय https://goo.gl/dM92zq
- शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्तांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सचिन तांबेंनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती http://abpmajha.abplive.in/
- व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित, रायगडमधील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर घटनेनंतर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय https://goo.gl/9VYhdK
- 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना, 'मी मुख्यमंत्री बोलतोय' कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची माहिती https://goo.gl/t7ZgD5
- तीन ते चार दिवसात पावसाच्या पुनरागमनाचा हवामान खात्याचा अंदाज, दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता https://goo.gl/Fsv49W
- देशातला पहिला रोपांचा मॉल औरंगाबादमध्ये; शेकडो झाडांची रोपं विक्रीसाठी, मराठवाड्याच्या राजधानीतून एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
- समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा, शिवडे गावात 45 ठिकाणी फास लटकवले https://goo.gl/XkYqoF
- मुंबईकरांसाठी खुशखबर, 'म्हाडा'च्या घरांची जाहिरात बुधवारी निघणार, लॉटरीत यंदा 784 घरं https://goo.gl/VQBWoC
- मुंबईतल्या चेंबूरमध्ये मोनो तांत्रिक बिघाडाने नव्हे, तर अपघातानेच समोरासमोर, प्रत्यक्षदर्शीचा दावा, तर मदतीसाठी दुसरी मोनो पाठवल्याचं एमएमआरडीएचं स्पष्टीकरण https://goo.gl/SKDnTt
- पुण्यात जळीतकांड, दारुच्या नशेत पर्वती भागातील 27 गाड्या जाळल्या, आरोपी अटकेत https://goo.gl/AU2jmg
- मैत्रिणीशी ओळख करुन न दिल्याने पुण्यात तरुणाला बेदम मारहाण, मुंढवा परिसरातील घटना, तीनजण अटकेत, दोनजण अजूनही फरार https://goo.gl/zGtjBa
- जीएसटीचा फटका विठूरायाच्या भक्तांना, पंढरपुरात लाडूचा प्रसाद 2 रुपयांनी महागणार https://t.co/Iq5VqKaTRx
- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवागसह सहा दिग्गज शर्यतीत, सोमवारी होणाऱ्या मुलाखतीनंतर नावावर शिक्कामोर्तब https://goo.gl/gpMoRY
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement