एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2020 | शनिवार
- मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश, WHO कडून दखल, धारावी मॉडेल संपूर्ण देशासाठी दिशादर्शक, मुख्यमंत्र्याचे गौरवोद्गार https://bit.ly/2DrWdc5
- लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती, ‘सामना’च्या मुलाखतीत शरद पवार यांचं प्रतिपादन, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाबत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा https://bit.ly/2Zk8AzK
- भाजपसोबत शिवसेना नसती तर विधानसभेत 40-50 जागाच जिंकता आल्या असत्या, ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी भाजपला आरसा दाखवला https://bit.ly/322tx3Q
- कोकणात गौरी-गणपतीसाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वॉरंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश https://bit.ly/3eg2Wmp तर मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवाची नियमावली जाहीर https://bit.ly/3eeAcdC
- मुंबईतील खार पोलीस स्टेशन मधील सहा पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्लाझ्मा दान, कोरोनाचा पराभव केलेले अन्य पोलीसही लवकरच प्लाझ्मा दान करणार https://bit.ly/38O1jv1
- दिल्लीमधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय, विद्यार्थ्यांना लवकरच पदवी प्रमाणपत्र मिळणार, दिल्लीतल्या केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेण्याचं मनीष सिसोदिया याचं आवाहन https://bit.ly/3ek37wP
- ऐन पेरणीच्या काळात राज्यातील कृषी सेवा केंद्राची टाळेबंदी; विक्रेत्यांचा तीन दिवसांचा संप, निकृष्ट बियाणे प्रकरणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करायला संघटित विरोध https://bit.ly/2C05IPv
- कोरोना व्हायरस महामारी 100 वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य, आर्थिक संकट असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मत, उत्पादन आणि नोकऱ्यावर विपरित परिणाम झाल्याचा निष्कर्ष https://bit.ly/2Wan2bs
- हाँगकाँगच्या विषाणू विज्ञान तज्ज्ञाने फाडला चीनचा बुरखा, कोरोनाच्या प्रादुर्भावाची चीनला आधीपासून माहिती असल्याचा आरोप, जिनपिंग प्रशासनाने जाणीवपूर्वक माहिती दडपली https://bit.ly/3fvNT9i
- कोरोनाकाळातही प्रसिद्धीचा सोस, बार्शीतील तरुणाने बनवून घेतला सोन्याचा मास्क https://bit.ly/38Jj66C
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement