एक्स्प्लोर

Nagpur Crime : प्रवासातील ओळख पडली महागात, तरुणीवर दोघांचा अत्याचार

काटोल ते नागपूर प्रवासादरम्यान तरुणीची ओळख अली सोबत झाली. त्याने त्याच्या मित्रासोबत तरुणीवर तीन महिन्यात अनेकवेळा बलात्कार केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

नागपूरः प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीवर विश्वास ठेवणे एका 23 वर्षीय तरुणीला महागात पडले आहे. औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणीला आणखी उच्चपदाच्या नोकरीची गरज होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. नंतर आरोपीच्या मित्रानेही प्रकरण निवळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे.

औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर अत्याचार केला. कमर अली कारंजावाला (वय 45)रा. हुडको अपार्टमेंट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर आसिफ शेख रा. यशोधरानगर असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही नागपुरातील एका औषधाच्या दुकानात काम करते. 15 एप्रिल रोजी तरुणी काटोल ते नागपूर असा प्रवास करीत असताना तिची कमर अली सोबत ओळख झाली. दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यानंतर दोघांचा नेहमी संपर्क होत गेला. पीडित तरुणीला आणखी उच्चपदाच्या नोकरीची गरज होती. ही बाब तिने कमर अलीला बोलून दाखविली. या संधीचा फायदा घेत कमर अलीने घेतला.

नोकरी लाऊन देण्याच्या बहाण्याने आमिष दाखविले. नंतर बोलण्यात थापा मारून जाळ्यात ओढले. तरुणी जाळ्यात अडकल्याची खात्री पडताच त्याने घरी कुणी नसताना नोकरीसाठी लागणारे कागदपत्र घरी घेऊन येण्यास सांगितले. ती कमर अलीच्या घरी आली. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर ही बाब कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जवळपास 26 जूनपर्यंत तो मिळेल तेव्हा पीडितेवर अत्याचार करू लागला. त्याने या दरम्यान तिला मारहाणही केली. या भीतीपोटी पीडित सर्व प्रकार सहन करत होती.

मित्रानेही केला अत्याचार

पीडित मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती कमरने आपला मित्र आसिफला सांगितली. आसिफनेही कमरच्या पावलावर पाऊल टाकत पीडितेला कमरचे प्रकरण पूर्णपणे निवळण्याची ग्वाही दिली. दरम्यान 26 जून रोजी आसिफच्या घरी कुणी नव्हते. त्याने मुलीला प्रकरण निवळण्यासाठी घरी बोलाविले. ती घरी येताच त्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोघांकडून वारंवार होत असलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या पीडित तरुणीने शेवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दोघांवरही बलात्काराचा गुन्हा नोंदवून कमर अलीला अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Karkhana Election : दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget