एक्स्प्लोर

शेतमजूर मिळेनात? घाबरु नका, पेरणी ते काढणी सर्व कामं करणारं मशीन!

आता शेतकऱ्यांना शेतमजुरावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व काम करणारं एक मशीन बनवण्यात आलं आहे.

वाशिम: सुगीच्या दिवसा शेतमजुर मिळणं हे शेतकऱ्यांसमोरचं मोठं आव्हान असतं. एकीकडे पीकं काढण्याची लगबग सुरु असते, त्याचवेळी शेतकऱ्याचं आभाळाकडे लक्ष असतं. कारण हातातोंडाशी आलेलं पीक पावसात अडकू नये म्हणून सुगीत शेतकऱ्यांची गडबड सुरु असते. त्यासाठी जास्तीत जास्त शेतमजुर घेऊन पीक काढण्याचा प्रयत्न असतो. मात्र आता शेतकऱ्यांना शेतमजुरावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व काम करणारं एक मशीन बनवण्यात आलं आहे. हंगामातील काढणीच्या काळात शेतकऱ्यांना मजुरांच्या तुटवड्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शेतातील मालाची वेळेत काढणी होणं गरजेचं असतं. मात्र या काढणीसाठी मजुर काही मिळत नाही. वाशिम जिल्ह्यात प्रामुख्यानं सोयाबीनचं पीक घेतलं जातं. सध्या सोयाबीनचं पीक काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र काढणीला मजुरचं न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. यावर कारडा कृषी विज्ञान केंद्रानी हायटेक उपाय शोधलाय. मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणजेच मशीनद्वारे काढणी करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. हा सगळा प्रयोग लेबरलेस फार्मिंग या त्यांच्या उपक्रमाखाली करण्यात येतोय. त्यामध्ये नांगरणीपासून काढणीपर्यंतची सगळी कामं मशीनद्वारे करण्यात येतात. पारंपारिक पद्धतीने सोयाबीन काढणीसाठी जिथे एकरी 4 हजाराचा खर्च येतो, तिथे या मशीनद्वारे निम्म्या खर्चात काढणी होते, असं कृषीतज्ज्ञ सांगतात. एका तासात एक एकर पिकाची काढणी या मशीनद्वारे एका तासामध्ये एक एकरातील पिकांची काढणी होते. पीक काढणी नंतरचा माल थेट ट्राली अथवा पोत्यामध्ये भरता येतो. मॅकेनिकल कंबाईन हार्वेस्टरद्वारे निघणारा कुटार उत्तम प्रतीचा असतो. जनावरांसाठी त्याचा वापर करता येतो. याचं प्रात्यक्षिक करडा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना दाखविण्यात आलां. या प्रयोगाला शेतकऱ्यांचा उत्त्म प्रतिसाद मिळालाय. कृषी विज्ञान केंद्र करडाद्वारे या मॉडेलचा प्रयोग रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडेमध्ये 50 एकरावर करण्यात आला. यामध्ये मॅकेनिकल कंबाइन हार्वेस्टर मालक आणि शेतकरी यांच्यामध्ये करार करून पिकांची काढणी केली गेली. या लेबरलेस मॉडेलमुळे शेतकऱ्याचा मजुरांचा मोठा प्रश्न सुटणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या काढणीमध्ये या मॉडेलची मोठी मदत होऊ शकते. कृषी विज्ञान केंद्र कराडने  केलेल्या या प्रयोगानं शेतकऱ्यांचा चिंतेचा भारच कमी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'चं वातावरण तापलं; 2-4 नाही, थेट 11 स्पर्धक नॉमिनेट, काझी तौकीर अन् माही विजवरही एलिमिनेशनची टांगती तलवार
'बिग बॉस 20'चं वातावरण तापलं; 2-4 नाही, थेट 11 स्पर्धक नॉमिनेट, काझी तौकीर अन् माही विजवरही एलिमिनेशनची टांगती तलवार

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
Ajay Devgn Drishyam The Conclusion Free Pav Bhaji: 'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Embed widget