एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : भेंडीबाजार दुर्घटना : मृतांचा आकडा 34 वर, बचावकार्य थांबवलं
भेंडी बाजार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 34 वर पोहोचला आहे. मात्र आता एनडीआरएफने बचावकार्य थांबवलं आहे. मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी ही इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान कोसळली.
LIVE
Background
भेंडी बाजार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 34 वर पोहोचला आहे. मात्र आता एनडीआरएफने बचावकार्य थांबवलं आहे.
मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी ही इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान कोसळली.
11:10 AM (IST) • 01 Sep 2017
भेंडी बाजारातील हुसैनी इमारत कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या आता 34 वर पोहोचली आहे.
07:42 AM (IST) • 01 Sep 2017
हुसैनी इमारत कोसळून आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 16 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि बचाव पथकाचं काम काल दिवसभरापासून ते रात्रभर सुरुच आहे.
काल सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास 125 वर्ष जुनी असलेली 5 मजली हुसैनी इमारत काही क्षणात कोसळली. या इमारतीच्या खाली असलेल्या गाळ्यांमध्ये आजूबाजूच्या हॉटेलात काम करणारे लोक राहात होते. काही ठिकाणी जेवण बनवण्याचं कामही होत होतं. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर 5 कुटुंबं वास्तव्यास होती.
विशेष म्हणजे याच इमारतीत एक प्ले स्कूलही चालवण्यात येत होतं. जे 10 वाजता सुरु व्हायचं. पण त्याआधीच इमारत कोसळल्यानं अनेक चिमुकल्यांचे जीव वाचलेत.
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.
23:39 PM (IST) • 31 Aug 2017
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटना :मृतांचा आकडा आणखी वाढला, आतापर्यंत 24 मृतदेह हाती
20:14 PM (IST) • 31 Aug 2017
भेंडीबाजार इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अजूनही १०-१२ लोक अडकल्याची भीती
20:11 PM (IST) • 31 Aug 2017
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटना :मृतांची संख्या 21 वर, तर 13 जण जखमी
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement