एक्स्प्लोर
जाट समाजाच्या विरोधानंतर 'पानिपत'मधील 11 मिनिटांच्या सीनवर कात्री
जाट नेत्यांनी या सिनेमावरच बंदी घालण्याची मागणी केली होती. कारण यामध्ये ऐतिहासिक तथ्ये कथितरित्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत, असा त्यांचा आरोप होता.
मुंबई : 'पानिपत' चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता त्यामधील वादग्रस्त भागावर कात्री चालवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राजस्थानमधील जाट समाज या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटातील महाराजा सूरजमल यांच्याशी संबंधित वादग्रस्त सीन डिलीट करुन सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. एडिट झाल्यानंतर चित्रपटाची लांबी 11 मिनिटं कमी झाली आहे.
अतिरिक्त गृहसचिव राजीव स्वरुप यांच्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते वादग्रस्त भाग हटवणार असल्याचं वितरकांनी सांगितलं आहे. चित्रपटाचं एडिटेड व्हर्जन निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलं आहे.
भरतपूरचे जाट राजा, महाराजा सूरजमल यांना लालची आणि स्वार्थी राजा दाखवल्याने 'पानिपत'वर वाद झाला होता. जाट समुदायाच्या विरोधानंतर राजस्थानमध्ये पानिपतच्या कमाईत तोटा होत आहे. विरोधामुळे राज्यातील अनेक थिएटरमध्ये चित्रपटाची स्क्रीनिंग होऊ शकलेली नाही. सोमवारी (9 डिसेंबर) आंदोलकांनी एका थिएटरची तोडफोडही केली होती.
Panipat Review : भळभळत्या जखमेवरची फुंकर
यानंतर विरोध करणाऱ्या जाट महासभेच्या नेत्यांसाठी मंगळवारी (10 डिसेंबर) सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती. यानंतर जाट नेत्यांनी या सिनेमावरच बंदी घालण्याची मागणी केली होती. कारण यामध्ये ऐतिहासिक तथ्ये कथितरित्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत, असा त्यांचा आरोप होता. मात्र चित्रपटावर बंदी घालण्याचा कोणताही इरादा नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. या चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय वितरक आणि थिएटर मालकांनी घेतला आहे.
पानिपत हा चित्रपट 1761 च्या पानिपच्या लढाईवर आधारित आहे. या सिनेमात अर्जुन कपूरने सदाशिवराव भाऊ यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर संजय दत्तने अफगाणिस्तानचा प्रशासक अहमदशाह अब्दालीच्या भूमिकेत आहे.
दरम्यान 'पानिपत' चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत नाही. सिनेमाने पाच दिवसात अवघ्या 22.48 कोटी रुपयांचीच कमाई केली आहे. सिनेमाने शुक्रवारी 4.12 कोटी, शनिवारी 5.78 कोटी, रविवारी 7.78 कोटी, सोमवारी 2.59 कोटी, मंगळवारी 2.21 कोटी असे एकूण 22.48 कोटी रुपये कमावले आहेत.
#Panipat continues to underperform... Fri 4.12 cr, Sat 5.78 cr, Sun 7.78 cr, Mon 2.59 cr, Tue 2.21 cr. Total: ₹ 22.48 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 11, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement