एक्स्प्लोर

बॉलिवूडमध्ये आणखी एक कोरोना बळी, निर्माते अनिल सुरी यांचं निधन

कर्मयोगी आणि राज तिलक या चित्रपटांचे निर्माते अनिल सुरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लिलावती आणि हिंदूजा या दोन्ही रुग्णालयांनी बेडच्या कमतरतेचं कारण देत अनिल सुरी यांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचं त्यांचे बंधू राजीव सुरी यांनी सांगितलं.

मुंबई : संगीतकार वाजिद खान यांच्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एका व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. निर्माते अनिल सुरी यांचं कोविड-19 मुळे मुंबईत निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. एबीपी न्यूजने अनिल सुरी यांचं बंधू राजीव सुरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, "2 जून रोजी ताप आल्यानंतर अनिल सुरी यांची प्रकृती खालावली होती. अशा अवस्थेत त्यांना लिलावती आणि हिंदूजा रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु बेड नसल्याचं कारण देत दोन्ही रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला."

यानंतर आम्ही त्यांना विले पार्लेमधील अॅडवान्स्ड मल्टिकेअर रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे त्यांच्या कोविड-19 सह अनेक चाचण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि काही वेळाने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचं कोविड-19 आणि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, असं राजीव सुरी यांनी पुढे सांगितलं.

लिलावती आणि हिंदूजा या रुग्णालयांनी अनिल सूरी यांना दाखल करुन घेतलं नाही, असा राजीव सुरींचा आरोप आहे. याबाबत एबीपी न्यूजने दोन्ही रुग्णालयांशी संपर्क साधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोन्ही रुग्णालयांकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही.

कर्मयोगी आणि राज तिलक यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अनिल सूरी यांनी ऐंशीच्या दशकात में राजेश खन्ना, फराह, जीतेंद्र आणि सदाशिव अमरापूरकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बेगुनाह' नावाच्या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन राम माहेश्वरी यांनी केलं होतं. परंतु हा चित्रपट पूर्ण होऊनही कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही.

दरम्यान अनिल सुरी यांचे बंधू राजीव सुरी हे अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मंजिल' चित्रपटाचे सहनिर्माता होते. राजीव सुरी यांनी बासु दा आणि भाऊ अनिल सुरी यांचं एकाच दिवशी झालेलं निधन हा विचित्र योगायोग असल्याचं म्हटलं. "एकाच दिवशी दोन जवळच्या व्यक्ती जाण्याचं दु:ख कायम मनात राहिल," असं ते म्हणाले. बासू चॅटर्जी यांचं 4 जून रोजी निधन झालं होतं.

संबंधित बातम्या

प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं मुंबईत निधन

कोरोनामुळे संगीतकार वाजिद खान यांचं निधन; आता आईलाही कोरोनाची लागण

Basu Chatterjee Passes Away | प्रसिद्ध दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget