Basu Chatterjee Passes Away | प्रसिद्ध दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील सांताक्रूज परिसरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक बासु चटर्जी यांचं वयाच्या 90व्या वर्षी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी निधन झालं आहे. मुंबईतील सांताक्रूज परिसरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपटष्टीत बासु दा अशी ओळख असलेल्या बासु चटर्जी यांनी अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ते बऱ्याच वर्षांपासून आजारी असून त्यांना डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरचाही त्रास होता.
चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी एबीपी न्यूजला बासु चटर्जी यांच्या निधनाबाबत माहिती देताना सांगितले की, वाढत्या वयातील आजारपणामुळे बासु दा यांचं निधन झालं आहे. आज दुपारी 2 वाजता सांताक्रूज येथे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.
70 आणि 80च्या दशकात हिंदी चित्रपटांतून वास्तव दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये चित्तचोर, रजनी, बातों बातों में, उस पार, छोटी सी बात, खट्टा-मीठा, पिया का घर, चक्रव्यूह, शौकीन, रुका हुआ फैसला, जीना यहां, प्रियतमा, स्वामी, अपने पराये, एक रुका हुआ फैसला यांसारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. एवढचं नाहीतर आपल्या या कामामुळे त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टिक आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. याव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शित केलेले रत्नदीप, सफेद झूठ, मनपसंद, हमारी बहू अलका, कमला की मौत, त्रियाचरित्र हे चित्रपटही रुपेरी पडद्यावर गाजले.
बासु दा यांनी 1969मध्ये आलेल्या सारा आकाश या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. चित्रपट सारा आकाशच्या दिग्दर्शनाआधी बासु दा यांनी 1966मध्ये रिलीज करण्यात आलेल्या राज कपूर आणि वहीदा रहमान अभिनित तिसरी कसम या चित्रपटासाठी बासु भट्टाचार्य यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
उल्लेखनिय गोष्ट म्हणजे, बासु दा यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक इलस्ट्रेटर आणि कार्टुनिस्ट म्हणून केली होती. त्यावेळचं लोकप्रिय साप्ताहिक 'ब्लिट्ज'मध्ये ते काम करत असतं. या साप्ताहिकासाठी त्यांनी 18 वर्षांपर्यंत काम केलं. त्यानंतर त्यांनी चित्रपटांचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.
मध्यमवर्गीयांच्या समस्यांवर भाष्य करणारे चित्रपट तयार करणं बासु दा यांची खासियत होती. बासु दा यांनी दूरदर्शनसाठी ब्योमकेश बख्शी, रजनीगंधा यांसारख्या लोकप्रिय मालिकांचंही दिग्दर्शन केलं. या मालिका त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत असल्याचं पाहायला मिळतं.
संबंधित बातम्या :
प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं मुंबईत निधन
कोरोनामुळे संगीतकार वाजिद खान यांचं निधन; आता आईलाही कोरोनाची लागण
नवाजुद्दीनच्या धाकट्या भावावर पुतणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप