एक्स्प्लोर
Advertisement
Movie Review | होता होता राहिलेला 'विजेता'
आपल्याकडे क्रिडाविश्वावर बेतलेले सिनेमे बनत नाहीत. आपल्याकडे म्हणजे मराठीमध्ये. पण त्याला अपवाद ठरला आहे तो विजेता हा चित्रपट. अमोल शेटगे दिग्दर्शित विजेता या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. म्हणजे, सर्वसाधारणपणे चित्रपटाची लांबी आणि मर्यादा लक्षात घेऊन एक खेळ घेऊन त्याभवती कथा, पटकथा गुंफली जाते. भाग मिल्खा भाग, चक दे, मेरी कोम, सुरमा ही त्याची काही उदाहरणं आहेत. विजेत्याने मात्र जरा मोठी उडी मारायची ठरवली.
या सिनेमात महाराष्ट्राची संपूर्ण टीम घ्यायचं ठरलं. परिणामी यामध्ये गोळाफेक, लांब उडी, कुस्ती, वेट लिफ्टिंग, रनिंग, ट्रायथॉन, बॉक्सिंग, तायक्वांदो असे खेळ घेण्यात आले आहेत. जेवढे खेळ तेवढे खेळाडू.. आणि त्यांचा एक कोच, माईंड़ कोच, डीन अशी मंडळीही आहेत. त्यामुळे याची व्याप्ती वाढते. हे कमी म्हणून की काय, पण यातल्या बहुतांश खेळाडूंची बॅकस्टोरीचाही समावेश यात करण्यात आला आहे. मग नंबरात येण्यासाठी जी दमछाक धावपटूला करावी लागते तशीच दमछाक या सिनेमाची झाल्याचं जाणवायला लागतं.
अमोल शेटगे हे अत्यंत अनुभवी दिग्दर्शक आहेत. शिवाय लेखकही. हा सिनेमा मुळात सौमित्र देशमुखचा आहे. सौमित्रला महाराष्ट्राच्या फेडरेशनने काही वर्षांपूर्वी निलंबित केलं आहे. पण त्यानंतर संघाची कामगिरी खालावते आहे. खेळाडू उत्तम असले तरी मानसिकरित्या त्यांचं मनोबल वाढवणं आवश्यक आहे. म्हणूनच त्याची डीन वर्षा ही सौमित्रला पुन्हा बोलावण्याचा निर्णय घेते. खेळाडूच्या मनाचा हरप्रकारे विचार करणारे सौमित्र आपल्या अटींवर येतात आणि संघाला माइंड कोच मिळतात. मग ते या टीमला कसं बूस्ट करतात.. संघाची कामगिरी उंचावते का.. अंतर्गत राजकारणाचा काही फटका कसा कुणााला बसतो अशाचा मिळून हा विजेता तयार झाला आहे.
Movie Review | सशक्त अभिनयाने तारलेलं 'मीडियम'
सिनेमाची गोष्ट लिहिताना फक्त सौमित्र देशमुख यांची बॅकस्टोरी येत नाहीत. तर वेगवेगळ्या भूमिका निभावलेल्या पूजा सावंत, प्रीतम कांगणे, देवेंद्र चौगुले, पुष्कराज जोशीलकर, माधव देवचक्के, सुहास पळशीकर या सगळ्यांच्या येतात. त्यामुळे सिनेमाची पटकथा विस्कळीत होते तशीच संथ आणि लांब. त्याचवेळी अनेक खेळ आल्यामुळे काही खेळ विस्ताराने दाखवतानाच काही खेळांना कात्री लागल्याचं दिसतं. यात उल्लेख करावा लागेल तो तायक्वांदो, लांब उडी यासारख्या खेळांचा आणि खेळाडूंचा. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की सौमित्र देशमुख जर माईंड कोच असतील तर त्यांचा वावर हा मुख्य कोचसारखा दिसतो. सकाळी चारला उठून मैदानावर जाणं.. धावणं आदी गोष्टी पाहता ते मुख्य प्रशिक्षक असल्याचा भास होतो. त्याचवेळी मुख्य प्रशिक्षक मात्र मैदानाच्या काठावर बसलेले दिसतात. सुशांत शेलार यांनी ती भूमिका निभावली आहे. बऱ्याच दिवसांनी शेलार यांना खमकी भूमिका मिळाली आहे. त्यांनी ती पेललीही आहे. पण ती लिहिताना माईंड कोच आणि मुख्य कोच यांच्यातला फरक दिसायला हवा होता असं वाटून जातं.
Movie Review | आगळा एबी आणि खमका सीडी!
पार्श्वसंगीत नेटकं असलं तरी सिनेमाभर वाजत राहणारी शिट्टी मात्र कानाला खटकते. साधी सरळ ट्यून एखाद्या उत्तम शीळ वाजवणाऱ्या कलाकाराकडून वाजवून घेतली असती तर ती सहज वाटली असती. इथे मात्र ती शीळ कॅसिओवर वाजवल्याने ती यांत्रिक वाटते आणि त्यातला गोडवा जातो. ('कुछ कुछ होता है'मधली शीळ आठवून पाहा. ती गोड वाटते कारण ती शीळ मारली आहे.) सिनेमासाठी कलाकारांनी, तंत्रज्ञांनी मेहनत घेतली आहे हे खरं. पण एथलीट म्हणून असलेलं फिजिक दिसणं ही सिनेमाची पहिली गरज आहे. छंद म्हणून धावणारा धावपटू आणि एथलीट यांच्यातला फरक दिसायलाच हवा होता. मिल्खा, मेरी, सुरमा यांनी तशी सवय आपल्याला लावली आहे. त्याला कोण काय करील? पटकथा सावरायला हवी होती असं वाटून जातं. संवादांमध्ये अनेक संवाद मनाचा ठाव घेतात. उल्लेख करायचा तर पळशीकरांचा स्वप्नांवरचा परिच्छेद, पेले-महम्मद अली यांचे संदर्भ आशयगर्भ आहेत. असं असलं तरी संवादांची शृंखला थोडी कमी करून त्याला स्क्रीन प्ले वाढायला हवा होता असं वाटून जातं.
Coronavirus | 'मलंग'च्या सक्सेस पार्टी दरम्यान मास्क लावून अनिल कपूरची एन्ट्री
कलाकारांबाबत दिलेलं काम त्यांनी चोख केलं आहे. सुबोध भावेचा सौमित्र आश्वासक वाटतो. यात पूजा सावंत सायकलिंग करताना पूरती कमाल दिसली आहे. देवेंद्र चौगुले कुस्तीपटू वाटतो. प्रीतम कांगणे-दिप्ती धोत्रेही खेळाडू वाटतात. पण तन्वी परब (बॉक्सिंग), पुष्कराज जोशीलकर (गोळाफेक), कृतिका तुळसकर (तायक्वांदो) यांना जरा आणखी वेळ असायला हवा होता असं वाटून जातं. माधव देवचक्के, मानसी कुलकर्णी, सुहास पळशीकर आदी कलाकाार नेटके आहेत.
इतका मोठा पसारा मांडायचा तर त्याला पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे. त्याला सुभाष घई यांच्यासारख्या शो मनचं नाव लागल्यानंतर ही अपेक्षा आणखी वाढते. बाकी कलाकारांचा वेळ, त्यांचं बॉडी टोनिंग हा एक भाग नंतर बघू असं ठरवलं तरी पटकथा गोळीबंद असायला हवी होती असं वटतं. म्हणूनच हा सिनेमा पकड घेता घेता लांबतो. रेंगाळतो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार्स. हा विजेता होता होता राहिला अशी भावना मनात घर करते हे नक्की.
Pravas Movie Review | जगणं विशेष बनवणारा 'प्रवास' | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
नाशिक
Advertisement