Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
Ajinkya Deo on Alka kubal: अजिंक्य देव यांनी 'माहेरची साडी' या सिनेमाच्या संबंधित अनेक किस्से शेअर केले.

Ajinkya Deo on Alka kubal: 1991 साली रिलीज झालेला 'माहेरची साडी' (MaherChi Saadi) हा सिनेमा प्रचंड गाजला. हा सिनेमा अजूनही मराठी प्रेक्षकवर्गाकडून पाहिला जातो. 'माहेरची साडी' या सिनेमात अलका कुबल (Alka Kubal), अजिंक्य देव (Ajinkya Deo), विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, रमेश भाटकर यांसह दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. 1991 साली 'माहेरची साडी' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांनी केले असून, संगीत अनिल मोहिते यांचे आहे.
अलका कुबलबाबत अजिंक्य देव नेमकं काय म्हणाले? (Alka Kubal Helped Make Maherchi Sadi a Blockbuster)
View this post on Instagram
अजिंक्य देव आणि अलका कुबल यासह या सिनेमातील कलाकारांना या चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अजिंक्य देव यांनी अलिकडेच 'the marathi founder' ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से शेअर केले. 'माहेरची साडी' या सिनेमात अजिंक्य देव यांनी 'विक्की' ही भूमिका साकारली होती. 'माहेरची साडी' या सिनेमाला मिळालेल्या यशामागे टिमसह अलका कुबल यांचा मोठा वाटा आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर व्हावा, यासाठी अलका कुबल यांचा मोठा वाटा आहे.
अजिंक्य देव म्हणाले, 'अलका कुबल ग्रासरूटची ॲक्ट्रेस आहे. गावाकडे यात्रा होतात. यात्रांमध्ये जाऊन ती आपले सिनेमा चालवायची. ती यात्रांमध्ये स्वत: उपस्थित राहायची. मोठमोठ्या यात्रा व्हायचे. तेव्हा खूप कॅशमध्ये धंदा व्हायचा. तेव्हा खूप चालायच्या यात्रा आणि चित्रपट चालायचे प्रचंड, आणि ती फेमस होती खूप. तिला गावाखेड्यांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली', असं अजिंक्य देव म्हणाले. आपण काम केलेल्या अभिनेत्रींबाबत अजिंक्य देव म्हणाले, 'सगळ्या हिरोईन्स माझ्या खूप चांगल्या होत्या. मला अर्चना जोगळेकर हिच्यासोबत काम करताना चांगलं वाटलं. तो तिच्यासोबत माझा पहिला सिनेमा होता. वर्षा, अश्विनी बरोबर पण माझे दोन-तीन चित्रपट झाले चांगले', असं अजिंक्य देव म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















