एक्स्प्लोर

Shivpratap Garudjhep: ...असा आहे 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपट

जो चेहरा छोट्या पडद्याच्या माध्यमातून जनमानसात छत्रपती शिवराय म्हणून रुजला, ज्या चेहऱ्याची ओळखच राजा शिवराय म्हणून झाली, त्या अमोल कोल्हेंना त्याच भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणं हा सोहळा आहे.

Shivpratap Garudjhep: शिवप्रताप गरुडझेप या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे ती म्हणजे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज. जो चेहरा छोट्या पडद्याच्या माध्यमातून जनमानसात छत्रपती शिवराय म्हणून रुजला, ज्या चेहऱ्याची ओळखच राजा शिवराय म्हणून झाली, त्या अमोल कोल्हेंना त्याच भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणं हा सोहळा आहे. भूमिकेतले छोटे छोटे बारकावे, त्यातला आवेश, त्यातला त्वेश, त्यातली निरागसता, त्यातली आक्रमकता, त्यातलं प्रेम, त्यातली काळजी सारं काही त्यांच्या थेट डोळ्यातून उतरतं. अत्यंत निर्वाणीच्या क्षणीही चेहऱ्यावर अत्यंत सहजपणे फुलणारं हसू त्या भूमिकेला आणखी उंचीवर घेऊन जातं.  त्यामुळं तुम्ही जर अमोल कोल्हेंना छोट्या पडद्यावर साकारलेल्या छत्रपतींच्या प्रेमात असाल तर मोठ्या पडद्यावरची ही कमाल पाहायलाच हवी.

सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे प्रत्यक्ष लाल किल्ल्यात झालेलं शूटिंग. खरं तर शूटिंग कुठेही झालं असलं तरी तुम्हाला पडद्यावर काय आणि कसं दिसतं हे जास्त महत्वाचं. आणि त्याच गोष्टीमध्ये या सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे. त्या किल्ल्याची, त्या वास्तूची भव्यता तितक्याच उत्तम पद्धतीनं रुपेरी पडद्यावर उतरली आहे. अर्थात याचं क्रेडिट सिनेमॅटोग्राफर म्हणून कमबॅक करणाऱ्या संजय जाधव यांना द्यायला हवं. कदाचित कमबॅक शब्द त्यांना आवडणार नाही कारण कॅमेरा हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. पण त्यांच्या कॅमेऱ्याने या सिनेमाला आणखी देखणं बनवलं आहे.

संगीत ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू. ‘जय भवानी, जय शिवराय’ हे या सिनेमाचं अँथम छान जमलं आहे आणि अर्थात ‘शेर आ गया है’ या गाण्याबद्दल बोलू तेवढं कमीच. मुळात ज्या जागेवर, ज्या प्रसंगी ते गाणं येतं त्या जागेची गाण्यासाठी निवड करणं ही कल्पनाच भारी आहे. आणि अर्थातच त्या कल्पनेला तितक्याच ताकदीनं साकारण्यात गीतकार आणि संगीतकाराचा वाटा फार मोठा आहे. ते शब्द, ते संगीत अक्षरश: अंगात भिनतं. याच गाण्याबद्दलची आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्याला दिलेली ट्रीटमेंट. आधी औरंगजेबाचं गुणगान सुरु असताना ज्या थाटात, ज्या डौलात वाघासारखी छत्रपती शिवरायांची एन्ट्री होते ते मोठ्या पडद्यावरच पाहायला हवं. 

औरंगजेबाच्या भूमिका साकारणारे यतीन कार्येकर, हरीश दुधाडे, प्रतीक्षा लोणकर, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, महेश फाळके, रमेश रोकडे, आदी ईराणी आणि युवराज संभाजीराजेंच्या भूमिकेतला हरक भारतीया या साऱ्यांनीच आपआपली भूमिका चोख पार पाडली आहे. 

 हे सगळं उत्तम असताना अर्थातच काही गोष्टी मला खटकल्या ज्याबद्दल बोलायलाच हवं. पहिलं म्हणजे महाराज ज्या शत्रूशी लढले तो महाबलाढ्य होता, राक्षसी ताकदीचा होता, रानटी होता आणि तितकाच चाणाक्षही होता. त्यांचं ते खतरनाक रुप जर व्यवस्थित ठसवलं गेलं तर आणि तरच त्यांच्याशी दोन हात करणाऱ्या आपल्या शिवरायांच्या पराक्रमाची उंची लोकांपर्यंत पोहचेल. शत्रुला इतकं मूर्ख आणि बावळट दाखवून काय साध्य होतं खरंच कळत नाही. हजारो, लाखोंच्या संख्येनं असलेल्या निर्दयी गनिमांच्या मुलखात जाऊन, त्यांच्या गराड्यात राहणं आणि त्यांना तोंड देणं जेवढं सिनेमात दिसतं तेवढं सोपं निश्चितच नव्हतं. ती दाहकता, ती भीती, तो थरार निर्माण करण्यात दिग्दर्शक कमी पडल्याचं जाणवतं त्यामुळं सिनेमाची एकंदर परिणामकारकता कमी होते. अगदी महाराज आणि औरंगजेबाची भेटसुद्धा पूर्णपणे एकतर्फी झाल्यासारखी दिसली. म्हणजे तो सामना ठळकपणे जाणवायला हवा होता. 

मला खटकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे या सिनेमाचे संवाद. खरंतर संवाद उत्तमच आहेत. कोणाचंही रक्त उसळवण्याची ताकद त्या शब्दांमध्ये आहे पण ते शब्द जरा पुरवून पुरवून वापरायला हवे होते. सतत पल्लेदार संवादांचा मारा यातल्या अत्यंत उत्तम आणि मोक्याच्या जागी येणाऱ्या संवादांचं महत्त्व कमी करतो. खरं तर अशा काही गोष्टी थोड्याफार खटकणाऱ्या असल्या तरी आपल्या राजांची, छत्रपती शिवरायांची, त्यांच्या पराक्रमाची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. तो थिएटरमध्येच जाऊन पाहायला हवा. या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स. 

Amol Kolhe : महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी... 'शिवप्रताप गरुडझेप' अवघ्या देशाचं लक्ष वेधणार : डॉ. अमोल कोल्हे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget