एक्स्प्लोर

We Have a Ghost Review : लाईट हार्टेड भुताची गोष्ट सांगणारा 'वी हॅव अ घोस्ट'!

We Have a Ghost Review : प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा 'वी हॅव अ घोस्ट' हा हलका-फुलका भावनिक सिनेमा खूपच मनोरंजनात्मक आहे.

We Have a Ghost Review : तुम्ही कधी भूत पाहिलंय का? अर्थात उत्तर नाही असेलच, मात्र लहानपणापासूनच भुतांच्या गोष्टी (Horror Story) किंवा जिथे कोणीच राहायला जात नाही अशा बंगल्यात भूत, एखाद्याचा आत्मा भटकतोय हे ऐकलं असेलच ना... हल्ली माणसंचं भुतासारखी वागत आहेत. त्यामुळे खऱ्या भुतांची भीती वाटेल का? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो खरा.. पण सध्या तो विषय बाजूला ठेवू.

धारपांच्या भयकथांचे तुम्ही नक्की चाहते असाल तर तुम्ही हॉरर सिनेमे देखील तेवढ्याच आवडीने पाहत असणार असं आपण गृहित धरु. जगभरातील सिनेमाच्या बाजारपेठेत हॉली ते बॉली सारख्या कित्येक सिनेमांनी मनात भय निर्माण केलंय, नवनवीन तंत्रज्ञान अन् डार्क मेकअप, प्रचंड खर्चिक आणि दर्जेदार अभिनयाची सांगड असणारा सिनेमा म्हणजे अॅक्शन आणि हॉरर सिनेमा होय.

वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला 'भेडिया' असो किंवा कार्तिकचा 'भूल भुलैय्या 2' हे सिनेमे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'स्त्री' सारख्या सिनेमांना प्रेक्षकांचं तुफान प्रेम मिळालंय, जरा ओटीटीकडे नजर मारली तर नुकताच लेखक-दिग्दर्शक ख्रिस्तोफर लँडन (Christopher Landon) यांनी 'वी हॅव अ घोस्ट' (We have a ghost) 
नावाचा एक विनोदी भयपट, कौटुंबिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. 

'वी हॅव अ घोस्ट' (We have a ghost) या सिनेमात डेव्हिड हार्बर (David Harobar) भुताची भूमिका साकारत असून या भुताचे नाव 'अर्नेस्ट' आहे. मात्र हे भूत तुम्हा आम्हाला घाबरवत नाही तर प्रेमात पाडतं. शिवाय सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे मार्व्हलचा सुपरस्टार अँथनी मॅकी (Anthony Mackie) म्हणजे फ्रॅंक याचं. फ्रॅंक हा एक व्यावसायिकाच्या भूमिकेत असून सतत आयुष्यात आलेलं अपयश आणि असफल राहण्याचे पाठीवर बसलेले शिक्के घेऊन आपल्या कुटुंबाला घेऊन, आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी त्यांच्या बजेटमधलं स्वस्तातलं जुनं घर घेतात. मात्र फ्रॅंकच्या दोन्ही मुलांना या नवीन आयुष्यात रस नसल्याचं जाणवतं. 

'वी हॅव अ घोस्ट' (We have a ghost) या सिनेमाची सुरुवात अगदी टिपिकल झालेली असून सिनेमाचं कथानक फ्रॅंकचा मुलगा केविन म्हणजेच जेही डियालो विन्स्टन (Jahi Di'Allo Winston) आणि घोस्ट म्हणजेच अर्नेस्टच्या अवतीभवती फिरतं.

सिनेमात फ्रॅंकने (Anthony Mackie)  स्वार्थी आणि पैसा कमावण्यासाठी नव्या संधीच्या मागे धावणाऱ्या दोन मुलांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. एका जुन्या पडक्या बंगल्यात फ्रँकचं कुटुंब राहायला जातं आणि इथेच केविनची ओळख अर्नेस्ट भुताशी होते, मात्र केविन त्याला घाबरुन न जाता भुताचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन घेतो.

पाहता पाहता घरातल्या सगळ्यांना या भुतांबद्दल कळतं आणि फ्रॅंक या भुताचा वापर करुन श्रीमंत व्हायची स्वप्नं पाहतो आणि नाईलाजाने सबंध कुटुंब साथ देऊ लागतं. भूत जगभर व्हायरल होतं आणि फ्रॅंक आणि त्याचं कुटुंब सेलिब्रिटी होऊन गेलेलं पाहायला मिळतं. कथानक नाट्यमय वळण घेत पुढे जातं, जुन्या घरात राहायला आलेल्या केविनसोबत भुताची घट्ट मैत्री होते. भूत अर्नेस्टची स्मरणशक्ती गेलेली असते. त्याला काही आठवत नसतं आणि बोलतादेखील येत नसतं. त्यामुळे केविन भुताला मदत करायची ठरवतो आणि त्याला मुक्ती देण्यासाठीची धडपड सुरु होते. भुताचा सुगावा सरकारी CIA एजंटला लागतो आणि मग CIA सोबतचा धमाकेदार संघर्ष आणि भुताचे उलगडणारे रहस्य आणि केविनच्या परिवाराचे श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण होतं का हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहायला हरकत नाही...

80 च्या दशकातली हॉरर कॉमेडी वेळखाऊ आहे, सिनेमाची हिरवळ केवळ बिग स्टारर अभिनेत्यामुळे आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा हलका फुलका भावनिक सिनेमा खूपच मनोरंजनात्मक आहे. मी या सिनेमाला देतोय अडीच स्टार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget