एक्स्प्लोर

Tiku Weds Sheru Review : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरचा 'टिकू वेड्स शेरू' आंबट गोड; वाचा रिव्ह्यू...

Tiku Weds Sheru : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरचा 'टिकू वेड्स शेरू' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Nawazuddin Siddiqui Tiku Weds Sheru Review : गेल्या काही दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चांगले सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहेत. अशातच बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतची (Kangana Ranaut) निर्मिती असलेला 'टिकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अवनीत कौर (Avneet Kaur) मुख्य भूमिकेत आहेत.

'टिकू वेड्स शेरू' सिनेमाचं कथानक काय आहे? (Tiku Weds Sheru Story)

'टिकू वेड्स शेरू' हा सिनेमा मुंबईत राहणाऱ्या ज्युनियर आर्टिस्ट शेरू आणि भोपाळमध्ये राहणाऱ्या टिकूची गोष्ट सांगणारा आहे. शेरूला सिनेसृष्टीत यश न मिळत असल्याने तो वाईट धंद्याचा अवलंब करतो. तसेच सिनेनिर्मिती करण्याच्या उद्देशाने तो कर्ज काढतो. पण त्याचे नुकसानच अधिक होते. 

शेरुचं लग्नाचं वय झाल्याने त्याच्याकडे टिकूचं स्थळ येतं. या लग्नामुळे त्याला 10 लाख रुपये मिळणार असतात.  टीकू आणि शेरू दोघेही या लग्नासाठी तयार होता. मुंबईत येऊन अभिनेत्री होण्याचं स्वप्न टिकू पाहते. लग्नानंतर ते मुंबईत येतात आणि शेरूच्या लक्षात येतं की, टीकूचा बॉयफ्रेंड असून त्याने तिला फसवलं आहे आणि आता ती प्रेग्नंट आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल. 

नवाजच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक

नवाजने शेरूची भूमिका खूपच चांगली साकारली आहे. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्याने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. त्यामुळे त्याच्या दर्जेदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. अवनीत कौरने आपली भूमिका चोख बजावली आहे. तसेच झाकिर हुसैन, मुकेश एस भट्ट आणि विपिन शर्मानेदेखील चांगलं काम केलं आहे. 

'टिकू वेड्स शेरू' कसा आहे? 

'टिकू वेड्स शेरू' हा वन टाइम वॉच सिनेमा आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. सिनेमा कुठेतरी रटाळ होतो. पण नवाज मात्र सिनेमा पुन्हा वर उचलतो.

'टिकू वेड्स शेरू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा साई कबीरने सांभाळली आहे. तर साई कबीर आणि अमित तिवारीने या सिनेमाचं लेखन केलं आहे. लेखन आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत हा सिनेमा कमी पडला आहे. एकंदरीत हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. 

संबंधित बातम्या

Tiku Weds Sheru trailer:27 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीननं केला किसिंग सीन; ट्रेलर पाहून भडकले नेटकरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur News : तुळजानगरी भाविकांंनी गजबजली, सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक तुळजापुरात #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 25 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाTop 70 at 7AM Superfast 25 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Embed widget