Jug Jugg Jeeyo Review : नात्यांची गुंफण जपणारा...'जुग जुग जिओ'
Jug Jugg Jeeyo Review :'जुग जुग जिओ' या सिनेमात धर्मा प्रॉडक्शनच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाची कथा नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Raj Mehta
Varun Dhawan, Kiara Advani, Anil Kapoor, Neetu Kapoor
Jug Jugg Jeeyo Review : सिने-निर्माता करण जोहरचा 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा मल्टी स्टारर सिनेमा चर्चेत होता. या सिनेमात वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. तर या तगडी स्टार कास्ट असलेल्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहताने सांभाळली आहे.
'जुग जुग जिओ' या सिनेमात धर्मा प्रॉडक्शनच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाची कथा नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तगडी स्टार कास्ट आणि सिनेमाच्या जोरदार प्रमोशनमुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कुठेतरी नक्कीच कमी पडतो.
कुकू (वरुण धवन) आणि नैनाच्या (कियारा अडवाणी) लव्हस्टोरीने 'जुग जुग जिओ' या सिनेमाची सुरुवात होते. दोघांचं लग्न होतं. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर ते घटस्फोटाचा निर्णय घेण्याचा विचार करतात. त्यांचा हा निर्णय घे घरच्यांना सांगण्याचं ठरवतात. पण कुकूचे वडील भीम म्हणजेच अनिल कपूर आणि आई गीता म्हणजेच नीतू कपूर घटस्फोट घेणार असल्याचं कुकूला कळतं. त्यामुळे आता कुकू त्याच्या आणि नैनाच्या घटस्फोटाचं घरच्यांना सांगणार की नातं वाचवणार...की कुकू-नैना आणि भीम-गीता घटस्फोट घेणार हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळेल.
वरुण धवनने आजवर अनेक विनोदी सिनेमांत काम केलं आहे. पण 'जुग जुग जिओ' या सिनेमात अनिल कपूर आणि मनिष पॉलने वरुण धवनला मागे टाकलं आहे. कियारा आणि नीतू कपूरचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर यूट्यूबर प्राजक्ता कोळीची भूमिका छोटी असली तरी छाप सोडून जाते. धर्मा प्रोडक्शन, वायकॉम 18 यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमातील 'रंगसारी', 'नाच पंजाबन' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले आहेत.