पावरफुल 'जया'ची गोष्ट; वाचा 'जया जया जया जया हे' चित्रपटाचा रिव्ह्यू
'जया जया जया जया हे' (Jaya Jaya Jaya Jaya Hey) या चित्रपटात अशा एका तरुणीची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जी घरगुती हिंसेला सडेतोड उत्तर देते.
Vipin Das
Basil Joseph,Darshana Rajendran
Jaya Jaya Jaya Jaya Hey: अनेक महिला या घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. पतीकडून मारहाण झाल्यानंतर काही महिला गप्प बसून केवळ सहन करण्याचा पर्याय निवडतात. पण काही महिला घरगुती हिंसाचाराला सडेतोड उत्तर देतात. 'जया जया जया जया हे' (Jaya Jaya Jaya Jaya Hey) या चित्रपटात अशा एका तरुणीची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जी घरगुती हिंसेला सडेतोड उत्तर देते. या चित्रपटाचं नाव एवढं मोठं आहे, पण चित्रपटाची कथा मात्र शॉर्ट अँड स्विट आहे.
'जया जया जया जया हे' या चित्रपटाची कथा ही जया नावाच्या मुलीच्या बालपणापासून सुरु होते. जयाच्या कुटुंबातील व्यक्ती तिचे लाड करत असतात. पण खेळी-कपडे यांसारख्या छोट्या गोष्टी तसेच शिक्षणासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टींसारख्या अनेक गोष्टींमध्ये जयाचे आई-वडील मुलगा-मुलगी हा भेद करत असतात. पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन जया शिक्षण घेत असते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षण घेण्यासाठी जया ही एका नामवंत कॉलेजमध्ये जाते. या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षकावर जया प्रेम करु लागते. पण तो शिक्षण एका क्षुल्लक कारणामुळे जयावर हात उचलतो. हे जयाला पटत नाही, त्यामुळे जया ते नातं तिथेच संपवते. त्यानंतर जयाचं कुटुंब तिचं लग्न लाऊन देण्याचा निर्णय घेतं.
जयाचं लग्न राजेश नावाच्या कोंबडी विक्रेत्यासोबत होतं. दोघांच्या संसाराची चांगली सुरुवात होते. पण लग्नानंतर काही काळानं जयाचा पती राजेश हा जयाला मारण्यास सुरुवात करतो. राजेश हा देखील क्षुल्लक कारणामुळे जयावर हात उगारत असतो. पण जया ही हिंसा सहन न करणारी मुलगी असते. एका दिवस जयाचा पती तिला मारण्याचा प्रयत्न करतो पण जया स्वत:चे संरक्षण करत पतीवर पलटवार करते. जया स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पतीवर हात उचलते. त्यानंतर राजेश आणि जयाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होते. राजेश हा जयाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतो. पण जया राजेशला घटस्फोट देते का? दोघांच्या नात्यात काय ट्वीस्ट येतो? ते पाहण्यासाठी तुम्हाला 'जय जय जय जय हे' हा चित्रपट बघावा लागेल.
अभिनेत्री दर्शना राजेंद्रननं 'जय जय जय जय हे' या चित्रपटात जया ही भूमिका साकारली आहे. तर राजेश ही भूमिका अभिनेता बेसिल जोसेफ हा साकारतो.