Showtime Review: अशा सीरिजसाठी हिंमत हवी, बॉलिवूडवर कडवट भाष्य करणारी वेब सीरिज, वाचा शो-टाईमचा रिव्ह्यू
Showtime Review: या वेब सीरिजमध्ये ज्या पद्धतीने दाखवले आहे, ते यापूर्वी कधीच दाखवले गेले नाही. अशी वेब सीरिज तयार करण्यासाठी आणि त्यात काम करण्यासाठी हिंमत लागते.
Mihir Desai and Archit Kumar
इम्रान हाश्मी, नसिरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडलेवाल, मौनी रॉय, विजय राज,
OTT
Showtime Review : फिल्म इंडस्ट्रीबद्दल सामान्यांमध्ये किती चर्चा होत असतात. राजकारण, घराणेशाही, कास्टिंग काउच आणि नको नको त्या मुद्यावरही चर्चा होत असते. परंतु हे सर्व या वेब सीरिजमध्ये ज्या पद्धतीने दाखवले आहे, ते यापूर्वी कधीच दाखवले गेले नाही. अशी वेब सीरिज तयार करण्यासाठी आणि त्यात काम करण्यासाठी हिंमत लागते. सिनेइंडस्ट्रीचे हे कटू सत्य या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.
वेब सीरिजची गोष्ट काय?
आपला मुलगा इम्रान हाश्मीला याला स्वत:चा स्टुडिओ देण्याऐवजी नसिरुद्दीन शाह यांनी त्यांची नात महिमा मकवाना हिला दिला आहे. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. इम्रानला कोणत्याही किंमतीत महिमाला संपवायचे आहे आणि त्यासाठी खूप राजकारण करतो. दरम्यान, सुपरस्टार राजीव खंडेलवाल काय करतात आणि कोणाला सपोर्ट करतात? या दोघांच्या भांडणात कोण उद्ध्वस्त होणार? चित्रपटसृष्टीतील कोणती रहस्ये उघड झाली आहेत हे जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज पाहावी लागेल.
कशी आहे वेब सीरिज?
ही वेब सीरिज पाहिल्यास तुम्हाला धक्का बसू शकतो. तुम्ही आतापर्यंत काही चर्चा ऐकल्या आहेत, त्या तुम्हाला पडद्यावर दिसतात. ही वेब सीरिज तुम्हाला हैराण करते. तुम्ही काही गॉसिपिंग ऐकले आहे, चर्चा ऐकल्या आहेत, त्याच्याही पुढील गोष्टी या वेब सीरिजमध्ये आहे. ही मालिका तुम्हाला गुंतवून ठेवते. अशी दृश्ये एकामागून एक येत आहेत जी तुम्हाला ही मालिका एकाच वेळी पाहण्यास भाग पाडतात. पुढच्या वेळी जर तुम्ही बॉलीवूडबद्दल वाईट बोलणार असाल तर आधी ही वेब सीरिज पाहा. काही बोलण्यासाठी तुम्हाला चांगले शब्द मिळतील.
अभिनय कसा आहे?
नसिरुद्दीन शाह एक अप्रतिम अभिनेते आहेत. ते स्वत: अभिनयाची एक संस्था आहे. या वेब सीरिजमधील प्रत्येक सीनमध्ये त्यांनी जीव ओतला आहे. नसिरुद्दीन शाह आपली मते रोखठोकपणे मांड असतात आणि या सीरिजमधील व्यक्तीरेखाही काहीशी तशीच आहे.
या वेब सीरिजमध्ये काम करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल अभिनेता इम्रान हाश्मीचे कौतुक करावे लागेल. त्याचे या सीरिजमध्ये काम खूप जबरदस्त आहे. इम्रान आपले मत प्रामाणिकपणे मांडण्यासाठी देखील ओळखला जातो आणि येथे तो त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलेपणाने बोलतो. त्याने कमाल अभिनय केला आहे. इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेता असो किंवा अभिनेत्याच्या घरी भांडण करण्यासाठी जाणारा निर्माता असो. त्याने चांगली भूमिका पार पाडली आहे. महिमा मकवानाचा अभिनय चांगला आहे. अभिनयाच्या बाबतीत तिने इम्रानला टक्कर दिली आहे. या सीरिजमध्ये तिने आपली छाप सोडली आहे. मौनी रॉय, राजीव खंडेलवाल यांची कामेही छान आहेत. श्रेया सरन ही लक्षात राहते. विजय राजनेही आपली छाप सोडली आहे.
दिग्दर्शन कसे आहे?
मिहीर देसाई आणि अर्चित कुमार यांचे दिग्दर्शन बऱ्यापैकी आहे. त्याने ही मालिका अशा प्रकारे साकारली याचे कौतुकच करावे लागेल. अशी अनेक सत्ये दाखवूनही दडलेली राहतात. काही ठिकाणी ही मालिका संथ वाटते. परंतु तो संथपणा आवश्यक वाटतो.