Bad Newz Review: विकी-तृप्तीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री, कसा आहे बॅड न्यूज? वाचा रिव्ह्यू
Bad Newz Review: कोणत्याही लॉजिकशिवाय चित्रपट पाहणार असाल तर हा चित्रपट चांगला एंटरटेन्मेंटसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
Anand Tiwari
विकी कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क,
Bad Newz Review: काही चित्रपट असे असतात की त्यांना पाहण्यासाठी फार डोक लावावं लागत नाही. असे चित्रपट पाहताना तर्क वगैरे बाजूला ठेवून पाहावे लागतात. फक्त निखळ मनोरंजन हवं असेल, टाईमपास करायचा आहे, कोणत्याही लॉजिकशिवाय चित्रपट पाहणार असाल तर हा चित्रपट चांगला एंटरटेन्मेंटसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
चित्रपटाची गोष्ट काय?
तृप्ती डिमरी गरोदर राहते. मात्र, तिच्या पोटी कोणाचे बाळ आहे? पूर्वाश्रमीचा पती विक्की कौशलचे आहे की त्याचा बॉस एमी विर्कचा? डॉक्टर सांगतात की हे बाळ दोघांचेही आहे. अशा घटनांना हेट्रोपॅटर्नल सुपरफिकंडेशन (Heteropaternal Superfecundation) असे म्हणतात आणि अशा प्रकारच्या घटना या लाखात एकदाच घडतात. आता त्या बाळाचा बाप कोण आहे, या गोष्टीभोवती या चित्रपटाची कथा आहे.
कसा आहे चित्रपट?
हा चित्रपट कोणत्याही लॉजिकशिवाय पाहाल तर तुम्हाला चांगला वाटेल. सुरुवात ठीकठाक आहे. थोड्या वेळात चित्रपट वेग पकडतो. मध्यंतरानंतर चित्रपट काहीसा निराश करतो. चित्रपटात काही सीन्सवर तुम्हाला हसू येईल. पोट धरून तुम्ही हसाल असे काही सीन्स नाहीत. विकी कौशल मात्र तुम्हाला अभिनयाने खिळवून ठेवेल. विकी कौशलची एनर्जी कमाल आहे. चित्रपटात विकी कौशलची छाप दिसून येते.
कलाकारांचा अभिनय :
विकी कौशल हा चित्रपटाचा प्राण आहे. तो प्रत्येक दृश्यात अप्रतिम आहे. अखिल चड्ढाची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. विकीच्या भूमिकेतील विविधता आश्चर्यचकीत करणारी आहे. सॅम बहादूर माणेकशॉ यांची व्यक्तीरेखा आणि या चित्रपटातील व्यक्तीरेखा, यामध्ये त्याने चांगला अभिनय केला आहे. बरेच लोक हा चित्रपट फक्त त्याच्यासाठीच पाहू शकतात. एमी विर्कचे कामही चांगले आहे. त्याचे कॉमिक टायमिंग उत्कृष्ट आहे, त्याची विकीसोबतची केमिस्ट्री चांगली आहे. तृप्ती डिमरीचे कामही चांगले आहे. ती या चित्रपटात सुंदर दिसते. नेहा धुपियानेही चांगले काम केले आहे, अनन्या पांडेचा कॅमिओही दिसेल.
दिग्दर्शन कसे आहे?
आनंद तिवारी यांचे दिग्दर्शन ठीक ठाक आहे. त्यांच्याकडे चांगले कलाकार होते आणि स्क्रिप्ट आणखी दम असता तर हा चित्रपट आणखी चांगला झाला असता. मध्यंतरानंतर चित्रपटावर मेहनत घेण्याची आवश्यकता होती.