Mithya 2 Review : ना सस्पेंस, ना कथा, ना अभिनय; मिथ्या 2 कडून पुरती निराशा
Mithya 2 Review : हुमा कुरेशीची मिथ्या 2 वेब सीरिज ओटीटवर रिली झाली आहे. जर तु्म्ही ही पाहण्याच्या विचारात असाल, तर त्याआधी रिव्ह्यू वाचून घ्या.
कपिल शर्मा
हुमा कुरेशी, अवंतिका दसानी, नवीन कस्तूरिया, रजित कपूर
ओटीटी प्लेटफॉर्म
Mithya 2 Web Series Review : जर तुम्ही सिंघम अगेन आणि भूल भुलैया चित्रपटामुळे निराश झाला असाल आणि तुम्हाला ओटीटीवर काहीतरी चांगलं पाहावं असं वाटत असेल, तर इथेही तुमच्या पदरी निराशा येणार आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीची मिथ्या 2 ही थ्रिलर-सस्पेंस वेब सीरीज ZEE5 वर रिलीज झाला आहे. ही वेब सीरीज सिंघम अगेन आणि भूल भुलैया सारखीच आहे. ज्याचा पहिला भाग चांगला होता पण, दुसरा भाग प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.
कथा
ही दोन सावत्र बहिणींची कथा आहे, जी एकमेकांना अपमानित करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. हुमा कुरेशी एक लेखिका आहे आणि अवंतिका दासानी एक व्यावसायिक महिला आहे. अवंतिका नवीन कस्तुरियाचा पाठलाग करते ज्याने तिच्यावर पुस्तक प्रकाशित केल्याचा आरोप केला आणि तिची कथा चोरली आहे. हुमाच्या वडिलांना जेव्हा हे कळते तेव्हा ते अस्वस्थ होतात, नंतर दोन बहिणींमध्ये काही दाव-पेच खेळले जातात, ज्या खूप बालिश आहेत आणि अशातच सीरिजचे 6 एपिसोड्स संपतात.
कशी आहे वेब सीरिज?
तुम्हाला ही वेब सीरिज कदाचित पूर्णपणे बघता येणार नाही. वेब सीरिजबद्दलची आवड, सस्पेंस निर्माण होत नाही. दीड एपिसोडनंतरच ही सीरीज कंटाळवाणी होऊ लागते. कोणताही ट्विस्ट आणि टर्न दिसत नाही, हे आश्चर्यकारक आहे. सहा एपिसोड्सची ही सीरीज असह्य वाटू लागते. दोन मुलं आपापसात भांडत आहेत, अशी कथा अगदी सरळ पद्धतीने दाखवली आहे, कुठेही कथेला धक्का लागत नाही, कुठेही वाटत नाही की, ही सीरीज आपल्या नावाप्रमाणे जगतेय. अशातच जर तुम्ही ही सीरीज पूर्णपणे पाहू शकाल तर ते तुमचे धैर्य मानलं जाईल.
अभिनय
अभिनेत्री हुमा कुरेशीने ठिक काम केलं आहे. महाराणीमध्ये हुमाने दमदार अभिनयाने जसा प्रभाव टाकला होता, तसा तिला पाडता आलेला नाही. याचं लिखाण खूप वाईट आहे आणि त्याचा परिणाम हुमाच्या अभिनयावर दिसत आहे. अवंतिका दासानी ही भाग्यश्रीची मुलगी आहे, ती आता नवीन आहे आणि त्यानुसार तिचा अभिनय प्रभावित करतो. जर तिला अधिक चांगल्या संधी मिळाल्या, तर ती खूप चांगली कामगिरी करू शकते. नवीन कस्तुरिया एक अप्रतिम अभिनेता आहे, पण इथे त्याचा योग्य वापर केला गेला नाही, त्याचे पात्र अधिक चांगले विकसित व्हायला हवे होते. रजित कपूरने चांगले काम केले आहे, पण वाईट कथेमुळे कोणाचाही अभिनय खास काम करु शकलेला नाही.
दिग्दर्शन
या मालिकेचे दिग्दर्शन कपिल शर्माने केले आहे. हा कॉमेडी नाईट्सचा कपिल शर्मा नाही, तो दुसरा व्यक्ती आहे आणि त्याचे दिग्दर्शन खूपच खराब आहे. दिग्दर्शकाला प्रेक्षकांना कथेशी जोडता आलेलं नाही, त्याला कथा सांगायची आहे, पण आणखी खूप काम व्हायला हवे होते. सस्पेंस पडद्यावर दाखवता आलेला नाही. सध्याच्या परिस्थितीत कंटेट खूप बदलला आहे, प्रेक्षकांना काहीतरी आश्चर्यचकित करणारे हवे आहे, पण या वेब सीरिज मधील त्रुटी प्रेक्षकांच्या सरळ नजरेस पडतात.
एकूणच या वेब सीरिजमध्ये पाहण्यासारखे काहीच नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :