LIVE BLOG : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा लढवणार, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात, नवरात्रोत्सवासाठी राज्यभरातल्या देवींच्या मंदिरांना रोषणाई, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनही सज्ज
2. शरद पवारांवरच्या गुन्ह्यामुळं व्यथित झाल्यानं राजीनामा, पक्षाची माफी मागताना पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक,बारामतीमधूनच विधानसभा लढणार
3. तिकीटवाटपावर आज मोदींच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार, तर मुख्यमंत्रिपदावर दावा करत उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचा पुनरुच्चार
4. ह्यूस्टन मोदी आणि यूएनमधील भाषणानंतर मोदींचं भारतात जंगी स्वागत, भाषणात मोदींकडून सर्जिकल स्ट्राईकची आठवण काढत जवानांना वंदन
5. जम्मू-काश्मीरमध्ये 12 तासांत 3 दहशतवादी हल्ले, भारतीय लष्कराकडून 6 दहशतवाद्यांचा खात्मा, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका
6. विविध कामांसाठी आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा























