आज दिवसभरात... 7 फेब्रुवारी 2019

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. मराठा समाजाचं 16 टक्के आरक्षण घटनाबाह्य, मुंबई हायकोर्टात आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद, निव्वळ राजकीय खेळी असल्याचा दावा
2. देशातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये होणाऱ्या महाप्रसादांमध्ये विष कालवण्याचा कट, मुंब्रा,औरंगाबादेतून अटक झालेल्या संशयित दहशतवाद्यांची कबुली
3. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं दुरुस्ती, आठवड्यातील 3 दिवस 6 तास विमान वाहतूक बंद, 21 मार्चनंतर वाहतूक पूर्ववत होणार
4. औरंगाबादेत पोलिसांमध्ये तुफान हाणामारी, वैयक्तिक कारणामुळे मारहाण झाल्याची माहिती, पुंडलिक नगरमधील घटना
5. अरबी समुद्रातील शिवस्मारकाची रचना बदलण्याची शक्यता, अश्वारुढऐवजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याचा विचार
6. विदर्भाला सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडक जिंकण्याची संधी; सौराष्ट्राची चौथ्या दिवसअखेर 5 बाद 58 अशी दाणादाण, विजयासाठी 206 धावांचं लक्ष्य























