LIVE : पीक विमा भरण्याचा अखेरचा दिवस

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
दिल्ली- पीकवीमा भरण्याची मुदत वाढवावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टींनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट
ग्रामीण भागात बँकाची संख्या कमी आहे. बँकेत पीक विमा काढण्यासाठी स्टाफ अपुरा आहे आणि शेतकर्‍यांच्या बँकांसमोर असलेल्या रांगा लक्षात घेता सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी केली आहे. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.

जालना जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या सर्वच शाखेत पीक विम्यासाठी गर्दी, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बँकेसमोर शेतकरी ताटकळत

राज्यातील शेतकऱ्यांची आज धावपळ पाहायला मिळत आहे. कारण पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ऑनलाईन फॉर्मच्या घोळामुळे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. बीडच्या खालापुरीमध्ये रांगेत उभं राहण्यावरुन वाद झाला आणि वादाचा रुपांतर भांडणात झालं. या भांडणात एका महिलेने 3 ते 4 जणांना चावा घेतल्याचं कळतं.

अनेक ठिकाणी शेतकरी काल रांगेतच झोपले आणि सकाळी उठून पुन्हा रांगेत लागले. मात्र बँकांच्या पीक विमा भरुन घेण्याच्या कालावधी पाहता असंख्य शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे सरकारने पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

बीडच्या खालापुरीमध्ये रांगेत उभं राहण्यावरुन वाद झाला आणि वादाचं रुपांतर भांडणात झालं. या भांडणात एका महिलेने 3 ते 4 जणांना चावा घेतला.

मुदतवाढीच्या प्रस्तावावर केंद्राकडून अद्याप कोणतंही उत्तर न आल्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पीक विमा भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यामुळे शेतकरी तहानभूक विसरुन बँकांसमोर रांगा लावत आहेत.

काल रविवारी सुट्टीच्या दिवशीही बीड, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातल्या बँका सुरु होत्या. काही बँकांमधले काऊंटरही वाढवण्यात आले होते. तसंच कृषी कर्मचाऱ्यांना आज दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. मात्र ऐनवेळी बँकांकडून सुरु असलेली धडपड अपुरी असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.