LIVE BLOG : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. रविवार दिवसभर नाशिक, कोल्हापूर, साताऱ्याला झोडपल्यानंतर पावसाची अल्पशी विश्रांती, गोदावरी, पंचगंगा आणि मुळासह अनेक नद्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती
2. गुजरातच्या वलसाड, वापी आणि वडोदरामध्ये पावसाचा कहर, मुंबई-अहमदाबाद मार्गावरची वाहतूक विस्कळीत, तर एमपीतही अनेक जिल्हे पाण्याखाली
3. मनसेप्रमुख राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्याची करणार मागणी
4. दिल्लीवारीसाठी मिलिंद देवरांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, संजय निरुपमांचा गंभीर आरोप, तर ज्योतिरादित्य शिंदेंकडूनही सरचिटणीसपदाचा राजीनामा
5. कर्नाटकातल्या आमदारांचं वास्तव्य असलेल्या मुंबईतल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शन, तर काँग्रेस जेडीएसचं सरकार कायम राहणार, सिद्धरमय्यांचा दावा
6. उद्यापासून राज्यभरातले 18 लाख रिक्षाचालक संपावर, ओला, उबरवर बंदी घालण्याची मागणी, हकीम समितीच्या शिफारशींसाठी उपसणार बंदचं हत्यार























