LIVE BLOG : मुंबईत विक्रोळीमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कंटेनरने चिरडलं
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल, विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली, दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार
2. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप, राष्ट्रवादीऐवजी वंचितशी हातमिळवणी करण्याचे संकेत
3. मंत्रालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, दुपारी अर्धा तासात जेवण उरकण्याचे आदेश, नागरिकांच्या सोयीसाठी सरकारचा जीआर
4. पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क, घटस्फोट प्रकरणातील पोटगीची रक्कम ठरवताना दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
5. पुढच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला बलिदान बॅज असलेले ग्लोव्ज बदलावे लागणार, बीसीसीआयची विनंती आयसीसीने फेटाळली
6. अमेरिकेतल्या चॅरिटी म्युझिक शोमध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस लूक, मिसेस सीएमनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस