LIVE BLOG : उद्योग धोरण 2019 या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
LIVE
Background
1. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधील डॉक्टर एटीएसच्या ताब्यात, आयसिसच्या नऊ संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज
2. पाकिस्तानला घरात घुसून मारु, अहमदाबादच्या सभेत पंतप्रधान मोदींचा संताप, तर बिकानेरमध्ये पाकच्या मानवरहित विमानाला सुखोई विमानांनी पाडलं
3. एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 300 मोबाईल अॅक्टिव्ह, 'रॉ'ची माहिती, मसूद अजहरचा 13 मार्चला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत फैसला
4. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन, विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च
5. आयसीआयसीआय बँकेच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची ईडीकडून 11 तास कसून चौकशी, व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती
6. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा वन डे सामना आज नागपूरमध्ये, पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाची 1-0 अशी आघाडी