LIVE BLOG : उपअभियंत्यावर चिखलफेक, नितेश राणेंसह 40 ते 50 समर्थकांवर गुन्हा

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. राहुल गांधींनी ट्विटरवरुन काँग्रेस अध्यक्षपदाचा उल्लेख हटवला, चार पानी पत्रात नवा अध्यक्ष निवडण्याचं आवाहन, काँग्रेसमधील अन्य नेत्यांबद्दलही नाराजी व्यक्त
2. तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांची संख्या 16वर, आठ जण अजूनही बेपत्ता, धरणापासून 7 किलोमीटरवर मृतदेह आढळले, तक्रार करुनही प्रशासन, पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
3. मराठवाड्यातील बहुतांश भाग अद्यापही कोरडाच, पेरणीयोग्य पाऊन नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली, जुलैपर्यंत सरासरीचा फक्त 11 टक्के पाऊस
4. मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास आता 440 रुपयांत, शिवनेरी आणि अश्वमेध बसच्या दरात 80 ते 120 रुपयांची कपात, सोमवारपासून नवे दर लागू
5. संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत दाखल, प्रसिद्ध मेढ्यांचा रिंगण सोहळा संपन्न, तर पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून भारुडाद्वारे जनजागृती
6. विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेण्याची शक्यता, पीटीआय वृत्त संस्थेची माहिती, तर विश्वचषकातून डावलल्यानं अंबाती रायडूची निवृत्तीची घोषणा























